नाशिक- कै.किशोर सुर्यवंशी स्मृती आंतरतालुका क्रिकेट स्पर्धेसाठी नांदगांव तालुका निवड चाचणी मनमाड येथे झाली. या चाचणीला उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. विविध कसोटीवर आधारीत या चाचणीत नांदगाव,मनमाडच्या क्रिकेटपटूंच्या क्रिडानैपुण्यांचे दर्शन यानिमित्ताने घडले. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे निवड समिती सदस्य बाळू मांडलिक,संजय परीडा,विभास वाघ यांनी प्रमुखपणे काम पाहिले. या चाचणीसाठी मनमाड येथील जयकुमार फुलवाणी, सिदार्थ रोकडे यांचे सहकार्य लाभले.



