जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांच्या हस्ते उद्घाटन, पावसामुळे सामना रद्द, ५० संघाचा सहभाग

उद्घाटन समारंभात खेळाडूंशी संवाद साधताना गंगाथरन डी व समवेत मंचावर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन चे कार्यकारी संचालक जी एस पी सिंग , सरव्यवस्थापक राजीव शर्मा , उपव्यवस्थापक सुरेश अय्यर , नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे , माजी विक्रीकर उपायुक्त प्रशांत सातव , एन डी सी ए चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे आणि सी ओ सी मुख्य माजी रणजी पटू राजेंद्र लेले.

नाशिकः शालेयस्तरावर उदयोन्मुख क्रिकेटपटूंना व्यासपीठ लाभलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने घेण्यात येत असलेल्या इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेला आज उत्साहात सुरवात झाली.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांच्या शुभहस्ते व इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे : कार्यकारी संचालक जी एस पी सिंग आदीच्या उपस्थित उद्घाटन झाले. यावेळी सरव्यवस्थापक राजीव शर्मा , उपव्यवस्थापक सुरेश अय्यर , नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे व प्रशांत सातव आदीची विशेष उपस्थिती होती. या प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाने खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले. .
पूर्णपणे झोकून दिल्यास यश आपलेच
जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी सुरुवातीलाच नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनला सुवर्णमहोत्सव वर्षा निमित्ताने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नाशिक मध्ये क्रीडाक्षेत्राच्या वाढीसाठी अजून खूप वाव असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यस्तरीय जास्तीत जास्त सामने खेळण्यास सुचविले. खेळाडूंना संबोधित करताना आपल्या प्रोत्साहनपर भाषणात आपले शालेय जीवनातील अनुभव सांगितले. व अभ्यास असो वा खेळ संपूर्णपणे झोकून देत प्रयत्न करण्याचा सल्ला दिला . अपयशाने कधीही आयुष्यात नाउमेद न होता परत परत न थकता प्रयत्न करीत राहण्याबद्दल मार्गदर्शन केले. विजयापेक्षा उलट अपयशातूनच जास्ती शिकायला मिळेल व तेच धडे आयुष्यात सर्वत्र जास्ती उपयोगी पडतील. शिस्त, नेतृत्वगुण संघभावना केवळ खेळात भाग घेतल्यानेच वाढू शकते . आई-वडील व गुरूंना मान देत जास्तीत जास्त प्रयत्न करण्यास
इंडियन ऑईलची भक्कम साथ
इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक जी एस पी सिंग यांनी शालेय विद्यार्थी व खेळाडू हेच देशाचे भवितव्य असुन इंडियन ऑइल नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील ह्याची हमी दिली व उदाहरणादाखल ईश्वरी सावकार व शर्विन किसवे या दोघांना मिळालेल्या इंडियन ऑइल शिष्यवृत्ती चा उल्लेख केला . तसेच शालेय क्रिकेटपटूंना यशस्वी होण्यासाठी: Desire, Discipline, Dedication व Determination हे चार डी प्रत्येकाने लक्षात घ्यावे असे सांगितले.. त्याबरोबरच जीवनातील मार्गदर्शक गुरूचे महत्व समजाऊन सांगून शुभेच्छा दिल्या . नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन ला सुवर्णमहोत्सव वर्षा निमीत्ताने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नेहमीच भक्कमपणे पाठीशी राहील याची हमी दिली .

बारामतीला विशेष संधी
प्रशांत सातव यांनी बारामतीला दिलेल्या खास मार्गदर्शन व संधिबद्दल आनंद व्यक्त केला. तर विनोद शहा यांनी आतापर्यतच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेत भविष्यात देखील क्रिकेटपटूंना जास्तीत जास्त संधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन सचिव समीर रकटे यांनी सुत्रसंचालन करत आभार मानले.
पावसामुळे सामन्यात व्यत्यय
इंडियन ऑइल आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा २०२२, वरुण राजाने साथ दिल्यास ठरल्याप्रमाणे वेळेवर अतिशय उत्साहात पार पडेल. शुक्रवारच्या जोरदार पावसामुळे ,ओल्या मैदनामुळे आज सामने पुढे ढकलण्यात आले. यात खास बाब म्हणून समावेश केलेल्या बारामतीच्या संघासह एकूण ५० संघांचा सहभाग असून , यातील दोन संघ पुर्णपणे मुलींचे आहेत.
भरघोष बक्षिसे आणि चुरशीचा खेळ
यापूर्वीच जाहीर केल्यानुसार स्पर्धेची रूपरेषा
– सुरुवातीच्या टप्प्यात, संघांची चार गटांमध्ये विभागणी
-प्रत्येकी २५ षटकांचे सामने बाद पद्धतीने खेळवले जातील.
– अव्वल चार संघात आयपीएल स्पर्धा स्वरूपानुसार उपांत्य फेरी
-उपांत्य फेरीचे सामने ३५ षटकांचे, तर अंतिम लढत प्रति संघ ४० षटकांची होईल.
– सर्व सामने रणजी केंद्र, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब मैदानावर खेळवले जातील.
– प्रत्येक सामन्यात सामनावीराचा पुरस्कार असेल.
– सर्व संघांना खास स्मृतिचिन्ह याशिवाय सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक असे पुरस्कारही
– या सर्व ट्रॉफीज प्रयोजक इंडियन ऑईलतर्फे देण्यात येणार आहेत.
– उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यांत सर्व खेळाडू इंडियन ऑईलने कडून मिळालेले रंगीत कपडे परिधान करून खेळतील.
——