उप उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या विजयात प्रतिकचे चार बळी

नाशिक- नाशिकचा डावखुरा फिरकीपटू गोलंदाज प्रतीक तिवारी याने अतिशय प्रभावी कामगिरी करून बी सी सी आय च्या विनू मंकड करंडक स्पर्धेतील उपउपांत्य फेरीत दिल्लीविरुद्ध ४ बळी घेत १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या विजयांत मोठा वाटा उचलला . सोमवार(ता.१७) ला अल्लेपी(केरळ) येथे उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राचा सामना दिल्लीशी झाला .

महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद ३१४ धावा केल्या त्या अर्शिन कुलकर्णी ११७, यश बोरमणी १०० यांच्या जोरावर. उत्तरादाखल दिल्ली संघ ३८.५ षटकांत सर्वबाद २२४ पर्यंत च मजल मारू शकला . नाशिकच्या प्रतीक तिवारीने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करताना ९ षटकांत २ निर्धाव ४२ धावा व ४ बळी अशी प्रभावी कामगिरी केली . प्रतीकने बी सी सी आय च्या १९ वर्षांखालील विनू मंकड करंडक स्पर्धेत आतापर्यंत ४ सामन्यांत एकूण ११ बळी घेतले आहेत. उपांत्य फेरीत जम्मू काश्मिर बरोबर बुधवारी(ता. १९) महाराष्ट्राचा सामना होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

X