एन डी सी ए ची १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धाः अंतिम सामन्यात एनएसएन
वर १३२ धावांनी विजय,आर्यन घोडकेची अष्टपैलु कामगिरी

नाशिक- जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या १४ वर्षांखालील आनंद (बाबा) शेट्टी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत एनसीए संघाने अंतिम सामन्यात एनएसएन संघावर तब्बल १३२ धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत सहा गटात २४ सहभागी संघातील एकुण ३७ सामने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब व महात्मा नगर क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले . एक दिवसीय मर्यादित ४५ षटकांचे सामने या स्वरूपात हि स्पर्धा खेळवण्यात आली .
अंतिम फेरीच्या सामन्यात एन एस एनने क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून नाशिक क्रिकेट अकादमीला प्रथम फलंदाजी दिली. नाशिक क्रिकेट अकादमीने निर्धारित ४५ षटकांत ५ बाद २६३ धावा केल्या. त्या तन्मय जगताप ७२ धावा व ध्रुव एखंडे ६६ धावा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर, तसेच आर्यन घोडकेने हि ३० धावा केल्या. एन एस एनच्या ओमकारने २ गडी बाद केले. उत्तरादाखल नाशिक क्रिकेट अकादमी आर्यन घोडकेच्या फिरकीने ५ बळी घेत एन एस एनने क्रिकेट क्लबला ३४.३ षटकांत १३१ पर्यंतच मजल मारून दिली. त्यास ज्ञानदीप गवळीने २ तर मंथन पिंगळे व समकीत मुथाने प्रत्येकी १ बळी घेत साथ दिली.
आर्यन घोडकेची चमकदार कामगिरी
आर्यन घोडकेने ५ बळी व ३० धावा अशी अष्टपैलू कामगिरी करत संघाला १३२ धावांनी विजयी करण्यात मोठा वाटा उचलला. या आनंद (बाबा) शेट्टी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत ज्ञानदीप गवळीने फलंदाजीत ६ डावात दोन शतके व १ अर्धशतकासह सर्वाधिक ४६४ धावा केल्या. त्यापाठोपाठ ध्रुव एखंडेने ५ डावात ३ अर्धशतकांसह २८२ धावा केल्या. गोलंदाजीत मंथन पिंगळेने ५ डावात सर्वाधिक १३ बळी घेतले. त्याखालोखाल आर्यन घोडकेने ४ डावात १२ बळी घेतले. आर्यन घोडकेने फलंदाजीतहि एका शतकासह ४ डावात २०० धावा करत अष्टपैलू कामगिरी केली . तर आर्य पारखने यष्टीमागे ८ बळी घेतले. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे दिवंगत पदाधिकारी आनंद (बाबा) शेट्टी यांच्या स्मरणार्थ एन डी सी ए तर्फे हि १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात आली.