`एनडीसीए`तर्फे गुरुवारी जिल्हा संघ निवड चाचणी

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा: उदयोन्मुख क्रिकेटपटूना कौशल्य दाखवत संघात स्थान मिळविण्याची संधी

नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे होणार्‍या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना( एन डी सी ए) तर्फे खुल्या गटातील खेळाडूंसाठी गुरुवारी(ता.९) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जिल्हा संघ निवड चाचणी येथे घेण्यात येणार आहे.

इच्छुक खेळाडूंनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथील कार्यालयात कामकाजाच्या वेळेत – सकाळी ८.३० ते १०.३० व संध्याकाळी ४.०० ते ६.३० पर्यंत – ८ फेब्रुवारी पर्यंत चाचणी शुल्कासह आपली नावे नोंदवावीत. संघ निवड चाचणी शुल्क प्रत्येकी पाचशे रुपये आहे.नावे नोंदविलेल्या खेळाडूंनी क्रिकेट पोशाखात स्वतःच्या क्रिकेट साहित्यासह गुरूवारी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता हजर रहावे.निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

X