`एनडीसीए`तर्फे शुक्रवारपासून जिल्हा संघ निवड चाचणी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्पर्धा होणार असुन त्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे शुक्रवार(ता.१४) आणि शनिवारी (ता.१५) असे दोन दिवस १४ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे घेण्यात येणार आहे.

यासाठी १ सप्टेंबर २००८ ( ०१/०९/२००८ ) नंतर जन्मलेल्या खेळाडूंचा विचार करण्यात येईल. इच्छुक खेळाडूंनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथील कार्यालयात कामकाजाच्या वेळेत गुरुवार १३ ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे, ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी. संघ निवड चाचणी शुल्क प्रत्येकी पाचशे रुपये आहे. निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.

नावे नोंदविलेल्या खेळाडूंनी क्रिकेट पोशाखात, स्वतःच्या क्रिकेट साहित्यासह शुक्रवारी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब वर सकाळी साडेनऊला हजर रहावे.

Leave a Reply

Your email address will not be published.

X