`एनडीसीए` चा आज सुवर्णमहोत्सव सोहळा,साक्षीदार होण्याची संधी

खेळाडूंचा गौरव,स्मरणिका प्रकाशन, मनोगत ऐकण्याचा योग, आवश्य या,असोसिएशन पदाधिकाऱ्यांचे आवाहन

संघटना,खेळाडू,प्रशिक्षक,संघटक अशा सर्वांच्या कामगिरीने महाराष्ट्रासह देशाचे लक्ष वेधणारी संघटना म्हणजे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन अर्थात एनडीसीए. एनडीसीए आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत असून हा सोहळा शनिवारी(ता.२५) सांयकाळी सहाला हुतात्मा अनंत कान्हेरे(गोल्फ क्लब) मैदानावर होत आहे. सदर सुवर्णमहोत्सवी सोहळा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – चे भूतपूर्व सेक्रेटरी अजय शिर्के , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार व विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या सोहळ्याच्या निमित्ताने पन्नास वर्षाच्या वाटचालीवर आधारीत एक विशेष स्मरणिका काढण्यात आली असून तिचे प्रकाशनही याच कार्यक्रमात होईल. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या खेळांडूनी नाशिकला वैभव प्राप्त करून दिले,अशा सर्वच प्रमुख खेळाडूंचा गौरव जिल्हा असोसिएशनतर्फे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. एनडीसीए नाशिक जिल्ह्यातील खेळाडू,प्रशिक्षक संघटकांचे हक्काचे असोसिएशन आहे. अर्थात यासाठी अध्यक्ष विनोद(धनपाल) शहा यांच्या नेतृत्वाखाली सर्वचजण मेहनत घेत आहे. अगदी ग्रामीण भागातील उदयोन्मुख क्रिकेटपटूला प्रशिक्षणासह सर्व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते. क्रिकेटपटू हा नियमित सरावात राहावा, या उद्देशाने आंतर तालुका क्रिकेट स्पर्धा बरोबरच जिल्हास्तरावर विविध स्पर्धा भरवण्यात असोसिएशनचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. राज्य-राष्ट्रीय स्तरापर्यंत नाशिक जिल्ह्याचे क्रिकेटपटू पोहचावे,यासाठी नावाजलेल्या प्रशिक्षकांच्या माध्यमातून नेहमीच मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यातूनच पन्नास वर्षात अनेक क्रिकेटपटूंनी रणजी संघाबरोबरच भारतीय अ.ब व इतर संघात स्थान मिळवून एनडीसीए चा पर्यायाने नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे, ही निश्चित गौरवास्पद बाब आहे.
तरी सर्व नशिकककर क्रीड़ा रसिकाना विनंती आहे की कार्यक्रमास उपस्थित रहावे

Leave a Reply

Your email address will not be published.

X