`एनडीसीए` च्या सुवर्ण महोत्सवी लोगोचे दिमाखात अनावरण

सुवर्ण महोत्सवी लोगोचा अनोखा अंदाज…जरूर पहा खालील लिंकवर

नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली आहे. एनडीसीए हे वर्षे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहे. त्यानिमित्ताने सुवर्ण महोत्सव लोगोचे अनावरण महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळाच्या डायरेक्टर लीना बनसोड यांच्या शुभहस्ते छोटेखानी कार्यक्रमात दिमाखात झाले.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान,गोल्फ क्लबवर हा कार्यक्रम झाला.. यावेळी विलासभाऊ लोणारी , नाना सूर्यवंशी , श्रीमती भालेकर , प्रशांत भालेकर व कुटुंबीय तसेच स्टार ईलेवनचे चंद्रशेखर- बंडू – दंदणे, तरुण गुप्ता, नॅशनल एग्रोचे मुजावर नबील ह्यांचेसह नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा , सचिव समीर रकटे , खजिनदार हेमंत देशपांडे , रमेश वैद्य ,राजाभाऊ भागवत तसेच इतर अनेक आजी व माजी पदाधिकारी , एन डी सी ए स्मरणिका संपादक दीपक ओढेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

X