`एनडीसीए` तर्फे ‘इंडियन ऑईल’ आंतरशालेय चषक स्पर्धा

सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य

नाशिक- जिल्हा क्रिकेट संघटना ( एन डी सी ए) २०२२ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहे. याच वर्षाचे औचित्य साधून जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धा व कार्यक्रम आगामी काळात घेण्यात येणार आहे. या अंतर्गत “ इंडियन ऑईल आंतरशालेय चषक “ ( Indian Oil Interschool Trophy) या नावाने जिल्हा आंतरशालेय अजिंक्यपद स्पर्धा ऑक्टोबर २०२२ मध्ये घेण्यात येणार आहे.

या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील ४८ शालेय संघ सहभागी होतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे रणजी ट्रॉफीचे केंद्र हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान , गोल्फ क्लब येथे ४७ सामने होतील. नामवंतांच्या हस्ते प्रत्येक सामन्यानंतर सामनावीराचे पुरस्कार देण्यात येतील. त्याबरोबरच स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज , सर्वोत्तम गोलंदाज, सर्वोत्तम यष्टीरक्षक, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक यांच्यासह अंतिम फेरीचा सामनावीर व स्पर्धेतील सर्वोत्तम क्रिकेटपटूस ही गौरविण्यात येणार आहे. सर्व नामवंत शाळांसह सुमारे ८०० शालेय क्रिकेटपटू सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या या रंगतदार स्पर्धेत भाग घेतील. यानिमित्ताने शालेय क्रिकेटपटूंना आपले कौशल्य व गुणवत्ता प्रदर्शनासाठी उत्तम व्यासपीठ मिळणार आहे.

स्पर्धेत जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे. त्याद्वारे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्याच्या कार्यक्रमात आपण आपोआपच जोडले जाल,असे आवाहन जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे करण्यात आले आहे. अधिक महितीसाठी समन्वयक सर्वेश देशमुख यांच्याशी – ८८८८८९७८०९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published.

X