`एनडीसीए` च्या सावकार,किसवे यांना `इंडियन ऑईल` शिष्यवृत्ती

नाशिकमधील तीन खेळाडूंचा समावेश

नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकार व शर्विन किसवे या दोन युवा उदयोन्मुख होतकरू क्रिकेटपटूंना मानाची इंडियन ऑईल शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे .

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्यातर्फे आज झालेल्या पत्रकार परिषदेत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन चे कार्यकारी संचालक जी एस पी सिंग यांच्यातर्फे नाशिककरांसाठी हि आनंददायी घोषणा केली. संपूर्ण भारतातून २५६ खेळाडूंना हि शिष्यवृत्ती मिळाली असून नाशिकमधील तीन खेळाडूंचा यात समावेश आहे. टेबल टेनिस खेळाडू कुशल चोपडा हा तिसरा खेळाडू.

सर्वीत्तम कामगिरीची दखल

ईश्वरी सावकार ची नुकतीच १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. मागील हंगामात ईश्वरी सावकार ची चॅलेंजर ट्रॉफी साठी महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झालेली होती. तसेच १९ वर्षांखालील चॅलेंजर ट्रॉफी व नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी दोनड ईश्वरी ची निवड झाली आहे.तर शर्विन उदय किसवे याची देखील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली होती . माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , होतकरू खेळाडूंसाठी हे शिबीर झाले. डावखुरा सलामीवीर शर्विन संघासाठी यष्टीरक्षकाची भूमिका देखील निभावतो . १४ वर्षे वयोगटापासूनच शर्विन ने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विविध स्पर्धात शर्विन फलंदाजीत धावा करण्यात नेहमीच आघाडीवर असतो. शर्विनने कुच बिहार करंडक स्पर्धेत महाराष्ट्र संघातर्फे मागील हंगामात कोलकाता येथे बाद फेरीतील सामन्यात मुंबईविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. या अतिशय मानाच्या शिष्यवृत्ती निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी ईश्वरी व शर्विनचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

3 thoughts on “`एनडीसीए` च्या सावकार,किसवे यांना `इंडियन ऑईल` शिष्यवृत्ती

Leave a Reply

Your email address will not be published.

X