एन सी ए ,२२ यार्डस,एन एस एफ ए, नाशिक जिमखान्याची उपांत्य फेरीत धडक

कै. शेखर गवळी मेमोरियल स्पर्धा : जयेश पवार,राहुल रत्नपारखी, यासर शेख सामनावीराचे मानकरी

नाशिकमध्ये रंगत असलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन- एन डी सी ए – व राम लखन क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित कै. शेखर गवळी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या दिवशी एन सी ए , २२ यार्डस , एन एस एफ ए व नाशिक जिमखाना यांनी आपले उपांत्यपूर्व फेरीचे सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला .

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर पहिल्या सामन्यात अद्वैत क्रिकेट अकादमीने एन सी ए विरुद्ध प्रथम फलंदाजी करत १६२ धावा केल्या. तनयकुमारने ६६ व श्रीकांत सुरेन्द्रने ३८ धावा केल्या. जयेश पवारने ३ गडी बाद केले. केवळ २ चेंडू बाकी असताना एन सी एने ४ गडी राखून विजय मिळवला. त्यात अभिजीत पवारने ४४ धावा केल्या तर अद्वैतच्या श्रीकांत सुरेन्द्रने २ व अभिजीत नेहरकरने १ गडी बाद केला.

दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी मिळालेल्या एन एस एफ एने जंबो विरुद्ध १५३ धावा केल्या. त्यात प्रतिक देवरेने ५२ व राहुल भगाडेने ३५ धावा केल्या. जंबोच्या मोहन केसीने २ गडी बाद केले. उत्तरादाखल एन एस एफ एच्या प्रतिक भालेराव ने पुनः एकदा भेदक गोलंदाजी करत ४ गडी बाद केल्याने जंबोला ९० पर्यंतच मजल मारता आली. राहुल भगाडेनेहि २ गडी बाद केले. जंबोच्या विकास धोत्रेने ३३ धावा केल्या.

महात्मनागर क्रिकेट मैदानावर पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी मिळालेल्या २२ यार्डसने गुरुदत्त दामलेच्या ५६ व ओंकार भवरच्या ४७ धावांच्या जोरावर आर टी स्पोर्ट्सविरुद्ध १७३ धावा केल्या. आर टी स्पोर्ट्सच्या पियुष पवारने ३ तर शंतनूने २ गडी बाद केले. उत्तरा दाखल आर टी स्पोर्ट्सला १३० धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यात प्रशांत मोरेने ३४ धावा केल्या . २२ यार्डसच्या राहुल रत्नपारखी ने ३ गडी बाद केले.

महात्मानगर क्रिकेट मैदानावर दुसऱ्या सामन्यात मेरीने नाशिक जिमखाना विरुद्ध प्रथम फलंदाजी करत १४७ धावा केल्या त्यात गोपीनाथ जाधवच्या सर्वाधिक ३५ . नाशिक जिमखानाच्या यासर शेख , अखिलेश सिंग व तन्मय शिरोडेने प्रत्येकी २ गडी बाद केले. उत्तरादाखल नाशिक जिमखानाच्या सलामीवीर यासर शेख नाबाद ७३ व कपिल शिरसाट ७१ यांच्या तडाखेबंद फलंदाजीने नाशिक जिमखानाने ९ गडी राखून विजय मिळवला. सर्व नाशिककर क्रीडारसिक , क्रिकेटप्रेमींनी या रंगतदार क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

उद्या(ता. ९) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

X