एन सी ए ,२२ यार्डस ,मेरी,आर टी स्पोर्ट्सची घौडदौड

कै. शेखर गवळी मेमोरियल स्पर्धा : सरावाचा आणि अनुभवांचा संघाना फायदा

नाशिकमध्ये रंगत असलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन- एन डी सी ए – व राम लखन क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित कै. शेखर गवळी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या दिवशी एन सी ए ,२२ यार्डस ,मेरी व आर टी स्पोर्ट्स विजयी झाले.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब वर पहिल्या सामन्यात २२ यार्डसने प्रथम फलंदाजी देत द्वारकाला १५८ धावांत रोखले. हर्ष शारदुलने ५३ धावा केल्या. कुणाल त्रिपाठी, कुणाल कोठावदे व वैभव अडसरेने प्रत्येकी २ गडी बाद केले. त्यानंतर २२ यार्डसच्या तनवीर सिंग ४६ , ओंकार भवर ४० व कुणाल कोठावदे यांनी ३५ धावा करत संघाला सात गडी राखून विजयी केले.

आर टी स्पोर्टस् विजय

दुसऱ्या सामन्यात आर टी स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करत १८८ धावा केल्या. रोहित तलरेजा ने ६२ तर प्रतीक चतुर्वेदी ने ३७ धावा केल्या. एन डी सी ए मॉर्निंगच्या मीत पटेल ने २ गडी बाद केले. उत्तरादाखल एन डी सी ए मॉर्निंगला १५६ धावाच करता आल्या. जयेश अहिरे ने ४० धावा केल्या. आर टी स्पोर्ट्सच्या शंतनूने ४ तर दीपक धांडोरेने २ गडी बाद करत संघाला ३६ धावांनी विजयी केले.

एनसीएची घौडदौड

महात्मानगर क्रिकेट मैदानावर पहिल्या सामन्यात एन एस एन ला प्रथम फलंदाजी देत एन सी एने केवळ ४२ धावांत रोखले. जयेश पवार ने ३ , विवेक यादव ने ४ तर अमित गवांदे ने २ गडी बाद केले. विजयासाठीच्या ४३ धावा ३ गडी गमावून करत एन सी एने सात गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात मेरीने मोहसीन पठाण लायन्स विरुद्ध प्रथम फलंदाजी करत २०४ धावा केल्या. त्यात गोपीनाथ जाधवने ७६ , सिद्धार्थ रिकामेने ४४ व अथर्व चौधरीने नाबाद ४२ धावांचे योगदान दिले.उत्तरादाखल मोहसीन पठाण लायन्सला १२९ पर्यंत च मजल मारता आली. सिद्धार्थ रिकामे व वेद सोनवणेने प्रत्येकी २ तर हार्दिक पटेल ने ४ गडी बाद केले व मेरीला ७५ धावांनी विजयी केले. सामनावीर सिद्धार्थ रिकामे. या सामन्यांमध्ये कुणाल कोठावदे, जयेश पवार व सिद्धार्थ रिकामे यांना सामनावीरांचे पारितोषिक देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

X