संजय परिंडा,अमित पाटील,सुयश बुरकूल,अविनाश आवारे, भावना गवळी विविध समित्यांवर वर्णी: अनुभव,कामगिरीची दखल

नाशिक- नाशिकच्या क्रीडाक्षेत्रासाठी अत्यंत आनंदाची व अभिमानास्पद बातमी आहे. एमसीए च्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सात जणांची निवड झाली आहे, अनुभवी आणि सलग आठ वर्षे स्पर्धा समिती सदस्य म्हणून काम करणारे सचिव समीर रकटे यांच्यासह संजय परिंडा,सलील आघारकर,अमित पाटील,सुयश बुरकुल,अविनाश आवारे, भावना गवळी यांचा समावेश आहे. या अनुभवी खेळाडू,प्रशिक्षकांमुळे राज्य क्रिकेट संघटनेला निश्चितच खूप मोठा फायदा होईल,अशी अपेक्षा आहे.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे यांची टॅलेंट हंट समिति मध्ये निवड झाली आहे. समीर रकटे यांनी यापूर्वी सलग आठ वर्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्पर्धा समिती सदस्य म्हणून काम बघितले आहे.
तीन अनुभवी रणजीपटू
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी कार्यकारिणी सदस्य संजय परिडा यांची स्पर्धा समिती सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
नाशिकचे तीन माजी रणजी पटू पुढीलप्रमाणे विविध पदांवर नियुक्त झाले आहेत: सलिल आघारकर महाराष्ट्र रणजी संघाचे निवड समिती सदस्य म्हणून पहिल्यांदाच निवड झाली तर अमित पाटील १६ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली असून सुयश बुरकुल ची १९ वर्षांखालील महिला संघाचे प्रशिक्षक पदी निवड झाली,तर मूळचे नाशिककर पण गोवा संघाकडून रणजी ट्रॉफी स्पर्धा गाजवलेले अविनाश आवारे रणजी सहायक प्रशिक्षक होत आहेत.
भावना गवळी यांनाही संधी
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या महिला खेळाडु संघ प्रशिक्षक भावना गवळी ह्यांची १५ वर्षांखालील महिला संघ व्यवस्थापक पदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या अध्यक्ष पदी रोहित पवार यांनी कामकाज सुरु केल्या नंतर विविध समित्यांची निवड करून जाहीर केली आहे. त्यात नाशिक च्या समीर रकटे यांच्या सोबत नविन सहा जणांना संधी मिळाली आहे. यापूर्वी ही नाशिक चे सहा जण अनेक वर्षांपासून विविध समितींवर काम करत होते.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे ह्या नेमणुका पुणे येथे जाहीर करण्यात आल्या .
नाशिक क्रिकेटच्या सदर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वरील राज्यस्तरीय निवडींमुळे , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
Congratulations 🙏
आपली कामगिरी व सहकार्य तसेच मार्गदर्शन मिळाले आहे.असेच मार्गदर्शन मिळावे ही विनंती अभिनंदन 🌹
🙏