महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनच्या संचालकपदी निवड- अनुभवाचा निश्चितच होणार सर्वांना फायदा

नाशिक-क्रीडक स्पोर्टिंग एक्सलन्स आणि परफॉर्मन्स प्रा लि चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक विनोद यादव यांची महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनच्या संचालकपदी( डायरेक्टर) नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ वसंत लुंगे व सचिव डॉ हनुमंत लुंगे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. नाशिककरांसाठी हा नक्कीच अभिमानाचा क्षण आहे.
विनोद यादव विविध क्रीडा संघटनांमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. डॉजबॉल असोसिएशन मध्ये प्रवेश करून डॉजबॉलला वरच्या पातळीवर नेण्याचा विनोद यादव यांचा मानस आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी , विनोद यादव यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहे.