खेळाडूंच्या पाठींवर कौतुकाची थाप अन् अनोखा सोहळा

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) च्या सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बारामतीच्या के ए सी एफ संघाने सेंट लॉरेन्स संघावर दहा गडी राखून सफाईदारपणे विजय नोंदवत चषक पटकावला. या सोहळ्यास महापालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व इंडियन ऑईलचे जी एस पी सिंग यांच्या हस्ते विजेत्या संघाला गौरविण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात आयुक्तांनी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए) व इंडियन ऑईलचे उत्तम स्पर्धा आयोजनाबद्दल कौतुक केले. तसेच भविष्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. आयुक्तांच्या हस्ते विजेत्या संघाला इंडियन ऑईल आंतरशालेय चषक प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मुंबईचे आयपीएल खेळाडु रोहित राजे , इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे : कार्यकारी संचालक जी एस पी सिंग, सरव्यवस्थापक राजीव शर्मा , नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, एन डी सी ए चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे ,सी ओ सी मुख्य माजी रणजी पटू राजेंद्र लेले , माजी विक्रीकर उपायुक्त प्रशांत सातव उपस्थित होते.सोहळ्यात सर्वच प्रमुख पाहुण्यांनी एनडीसीए च्या उत्तम संयोजनाचे प्रशंसा करण्याबरोबरच खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. या अनोख्या सोहळ्याची ही काही क्षणचित्रे,खास क्रीडारसिकांसाठी…..

Leave a Reply

Your email address will not be published.

X