स्टार इलेवन व एन डी सी ए आयोजित सुधाकर भालेकर चषकाचा शुभारंभ– दामले,बरमाडे,शिरसाट,तनपुरे यांचा उत्कृष्ठ खेळ

नाशिक-स्टार ईलेवन, नाशिकरोड पुरस्कृत, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित कै. सुधाकर भालेकर मेमोरियल चषकाचा शुभारंभ आज हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सुरवात झाली.
नाशिकचे लोकप्रिय, आदर्श माजी खेळाडू तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन पद भूषविलेल्या सुधाकर भालेकर ह्यांच्या स्मरणार्थ खेळविल्या जाणार्या स्पर्धेचे हे दहावे वर्षं. दरवर्षीप्रमाणेच स्टार ईलेवनचे भालचंद्र गोसावी, चंद्रशेखर-बंडू- दंदणे, तरुण गुप्ता ह्यांचेसह, सुधाकर भालेकर ह्यांचे सुपुत्र प्रशांत भालेकर ह्यांचा सहयोग स्पर्धा आयोजनासाठी मिळत आहे. यंदा ही स्पर्धा खुल्या गटातील नाशिकच्या निवडलेल्या १६ संघांमध्ये चार गटात , टिट्वेंटी स्वरूपात खेळवली जात आहे. २२ ते ३० डिसेंबर २४ साखळी सामन्यांनंतर चार गटवीजेत्यांत ३१ डिसेंबर रोजी उपांत्य व अंतिम सामने रंगतील.

नाशिक चे प्रतिनिधित्व केलेल्या माजी खेळाडू, प्रशिक्षक व पदाधिकारी दिवंगत बाबा शेट्टी, शेखर गवळी, अविनाश आघारकर, विजय भोर, जयंतीलाल अशा नावांनी १६ संघात , नाशिकच्या अंतिम तसेच नियोजित एन पी एल स्पर्धा संघ निवडीच्या हेतूने सदर स्पर्धा खेळविली जात आहे.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे व स्टार ईलेवन चे चंद्रशेखर- बंडू- दंदणे यांनी याप्रसंगी दिवंगत सुधाकर भालेकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला व खेळाडूंना प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले.

स्टार ईलेवन क्लब ,नाशिकरोड चे चंद्रशेखर -बंडू – दंदणे व तरुण गुप्ता ह्यांनी नाणेफेक करुन स्पर्धेस प्रारंभ केला. हयाप्रसंगी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे सचिव समीर रकटे, खजिनदार हेमंत देशपांडे ,निवड समिति सदस्य सतीश गायकवाड, फैय्याज गंजीफ्रॉकवाला, राजु आहेर, रतन कुयटे, संदीप सेनभक्त, असोसिएशनचे पदाधिकारी व चारही संघाचे खेळाडू, प्रशिक्षक व पंच उपस्थित होते.

पहिल्या दिवशी झालेल्या चार सामन्यांत फलंदाजीत रवींद्र मत्च्या ६९ , गुरुदत्त दामले ६५ , रोशन बरबाडे ५४, संदीप शिरसाट ४८ , नील तनपूरे ४७, श्रीकांत शेरीकर ४७, प्रवीण पाडवी ४५ , तनवीर सिंग व कुणाल कोठवदे प्रत्येकी ४३, तुषार इंद्रिकर ४० धावा करत तर गोलंदाजीत विशाल मोहिते, तुकाराम जुंबाड प्रत्येकी ३ बळी घेत चमक दाखवली .
आजच्या रंगतदार सामन्यांचे संक्षिप्त धावफलक व निकाल :
1) गोल्फ क्लब 1 – राजेश तारगे ईलेवन विरुद्ध शेखर गवळी ईलेवन – राजेश तारगे ईलेवन ईलेवन सर्वबाद ११९ – तनवीर सिंग ४३ , लोकेश जांगीड व शिवम स्वामी प्रत्येकी २ बळी वि. शेखर गवळी ईलेवन – ८ बाद १२० – कुणाल कोठवदे ४३, विशाल मोहिते ३ व रोहन शेडगे २ बळी . शेखर गवळी ईलेवन २ गडी राखून विजयी.
2) गोल्फ क्लब 2 – अविनाश आघारकर ईलेवन विरुद्ध चंदा शिंदे ईलेवन – अविनाश आघारकर ईलेवन ९ बाद १५६ – नील तनपूरे ४७, प्रवीण पाडवी ४५, हेमंत संधानशिव २ बळी वि चंदा शिंदे ईलेवन ३ बाद १५७ – रोशन बरबाडे ५४, पुष्कर अहिरराव ३०. चंदा शिंदे ईलेवन ७ गडी राखून विजयी.

3) गोल्फ क्लब 2 – अख्तर शेख ईलेवन विरुद्ध अशोक जैन ईलेवन – अख्तर शेख ईलेवन- ८ बाद १९३ – रवींद्र मत्च्या ६९, तुषार इंद्रिकर ४०, तुकाराम जुंबाड ३ बळी वि अशोक जैन ईलेवन – ७ बाद १५४ – श्रीकांत शेरीकर ४७,ओमकार भवर ३३, प्रतिक भालेराव २ बळी . अख्तर शेख ईलेवन ३९ धावांनी विजयी.
4) गोल्फ क्लब 1 – प्रकाश माळवे ईलेवन विरुद्ध बाबा शेट्टी ईलेवन – प्रकाश माळवे ईलेवन – सर्वबाद १२० – गुरुदत्त दामले ६५, ऋषिकेश कातकाडे, हर्षल सेनभक्त व ओम वाघमारे प्रत्येकी २ बळी विरुद्ध बाबा शेट्टी ईलेवन – ५ बाद १२४ – संदीप शिरसाट नाबाद ४८, मेघ ३५. बाबा शेट्टी ईलेवन ५ गडी राखून विजयी.