जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने – एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सुरु असलेल्या इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेतील सामन्याच्या दुसर्या दिवशी इंडियन ऑईलचे सरव्यवस्थापक गिरीराज यांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे व इतर पदाधिकारी,प्रशिक्षक उपस्थित होते.