चौरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात `इंडिया ए` ची `इंडिया बी` वर मात

ईश्वरी सावकारच्या सर्वाधिक धावा: चारही सामन्यात सलामीला येत नोंदवली सर्वीत्तम कामगिरी

श्रीलंका, वेस्ट इंडीज, इंडिया ए व इंडिया बी यांच्या चौरंगी मालिकेत, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने सलामीला फलंदाजीला येत अंतिम फेरीत देखील फलंदाजीतील सातत्य कायम ठेवत इंडिया ए विरुद्ध आपल्या इंडिया बी संघातर्फे सर्वाधिक ३६ धावसंख्या नोंदवली .

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित श्रीलंका , वेस्ट इंडीज विरुद्धची १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी चौरंगी मालिका वायझॅग इथे पार पडली. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत इंडिया बी ने २० षटकांत ७ बाद १२९ धावा केल्या . ईश्वरी सावकारने ३९ चेंडूत ६ चौकारांसह ३६ धावांचे सर्वाधिक योगदान दिले व १०.५ षटकांत ७७ धावांची सलामी दिली . विजयासाठी १३० धावा श्वेता शेरावत च्या ४३ धावांच्या जोरावर इंडिया ए ने १८.३ षटकांत ३ गडी गमावून पार करत विजय मिळवला .

ईश्वरी सावकारने इंडिया बी तर्फे सलामीला येत चारही सामन्यात सातत्यपूर्ण फलंदाजी चे प्रदर्शन घडवले. श्रीलंका विरुद्ध ४८ चेंडूत ३०,

वेस्ट इंडीज २६ चेंडूत ३२ , इंडिया ए ३२ चेंडूत ३६ व अंतिम सामन्यात ३९ चेंडूत ३६ धावा या प्रकारे प्रभावी कामगिरी करतांना तीनही साखळी सामन्यात इंडिया बी च्या विजयी धावसंख्येत मोठा वाटा उचलला. यासह भविष्यातील १९ वर्षांखालील संघ निवडीसाठी आपली भक्कम दावेदारी पेश केली. ईश्वरीच्या ह्या प्रभावी कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी ईश्वरी सावकारला शाबासकी देत अभिनंदन केले .

Leave a Reply

Your email address will not be published.

X