हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी: स्वप्नील राठोड,राहुल भगाडे,कुमार यादव,अनिश रावची उत्कृष्ठ फलंदाजी

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या खुल्या गटात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या सामन्यात जयश्री रॉयल व पठाण लायन्स यांनी सलामीच्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करत आपली विजयी सलामी नोंदवली.
पहिल्या सामन्यात जयश्नारी रॉयलने नाणेफेक जिंकून एफ सी सी ला प्रथम फलंदाजी दिली. प्रवीण कुमार यादवच्या ५० धावांच्या जोरावर एफ सी सीने सर्वबाद १९६ धावा केल्या. भूषण देशमुखने ३७ धावा केल्या. जयश्री रॉयलच्या राहुल भगाडेने ३ गडी बाद केले. जयश्री रॉयलने स्वप्नील राठोडच्या नाबाद ८० व राहुल भगाडेच्या नाबाद ६८ धावांमुळे ८ गडी राखून आरामात विजय मिळवला.

सुरवातीला चुरस पण नंतर एकतर्फी वर्चस्व
दुसऱ्या सामन्यात पठाण लायन्सने अतिशय चुरशीच्या लढतीत द्वारका क्रिकेट अकादमी बी वर १ गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना द्वारका क्रिकेट अकादमी बी ने अनिश राव ५३ , वंश चावला ३९ व अर्णव तांबटच्या ३८ धावांच्या जोरावर ४० षटकांत ७ बाद २२७ धावा केल्या. पठाण लायन्सनच्या शाहरुख पठाणने २ गडी बाद केले . उत्तरादाखल पठाण लायन्सच्या अनिश खानच्या नाबाद ५३ धावांमुळे ३९.५ षटकांत १ गडी राखून विजय मिळवला. त्यास परवेझ शाह , शहेबाज शाह प्रत्येकी ३१ ची साथ मिळाली. द्वारका क्रिकेट अकादमी बी च्या अनिश रावने ३ तर अर्णव तांबट व भाविक मंकोडी ने प्रत्येकी २ गडी बाद केले.
सामने पाहण्याची सुवर्ण संधी
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन – एन डी सी ए – ची डिजिटल सहयोगी स्पोर्टवोट, मुंबई ने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण प्रसारण सुरू केले आहे. स्पोर्टवोट हे अॅप डाउनलोड करून सर्व क्रीडाप्रेमी या सामन्यांचा आनंद कोठूनही थेट घेऊ शकतात.