थरारक सामन्यात नाशिकची हिंगोलीवर मात

वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धाः तन्मयचे सामन्यात तेरा बळी,सत्यजीतचे तडाखेबाज शतक,सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवाला-यासर शेखची दमदार खेळी

नाशिक-औरंगाबाद येथे खेळल्या गेलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए सिनियर इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने हिंगोली विरुद्ध सामन्याचे केवळ दोन चेंडू बाकी असतांना आठ गडी राखून रोमांचक विजय मिळवला. तन्मयचे तेरा बळी,सत्यजीतचे तडाखेबाज शतक आणि सलामीवीर मुर्तझा ट्रंकवाला-यासर शेख यांची प्रभावी कामगिरी,यामुळेच हा विजय मिळवणे अधिक सुकर झाले.असे म्हटले तर वावगे ठरू नये.

पहिल्या दिवशी हिंगोलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. डावखुरा फिरकीपटू तन्मय शिरोडेने जोरदार कामगिरी करत ८ गडी बाद केले. त्यामुळे नाशिकने हिंगोलीला ३६.२ षटकांत १६९ धावांत सर्वबाद केले. सत्यजित बच्छावने २ गडी बाद केले. उत्तरादाखल पहिल्या दिवसअखेर १७.४ षटकांत नाशिकने १ बाद १४५ पर्यंत मजल मारली. सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवालाने जोरदार फटकबाजी करत ६१ चेंडूत ६ षटकारांसह ९६ धावा ठोकल्या. यासर शेखने ४८ धावा केल्या. पावसामुळे जवळपास ३५ षटकांचा खेळ होऊ शकला नाही.

सत्यजीतची तडाखेबाज खेळी,गोलदांजीत करिष्मा

दुसऱ्या दिवशी कर्णधार सत्यजित बच्छावच्या ६३ चेंडूतील ६ षटकारांसह ठोकलेल्या घणाघाती शतकामुळे नाशिकने एकूण ५६.३ षटके खेळून ८ बाद ३९२ या धावसंख्येवर २२३ धावांची आघाडी घेत डाव घोषित केला. तेजस पवारने ५९ धावा केल्या. पिछाडीवरील हिंगोलीने दुसऱ्या डावात नाशिकच्या गोलंदाजीचा , चांगला सामना करताना सलामीवीर शुभम जाधवच्या शतकाच्या जोरावर ४७ षटकांत २ बाद २२४ पर्यंत मजल मारल्यानंतर तन्मय शिरोडेने ५ बळी घेत जोरदार धक्के दिले. तेजस पवारने शतकवीर शुभम जाधवला बाद केले. सत्यजित बच्छावने २ तर यासर शेख व सिद्धार्थ नक्काने प्रत्येकी १ गडी बाद केला आणि हिंगोलीला ६६ षटकांत २७७ धावांवर सर्वबाद केले. त्यामुळे हिंगोली ५४ धावांनी पुढे होते . सामना संपण्यास शेवटची केवळ ४ षटके बाकी होती. २४ चेंडूतील विजयासाठीच्या आवश्यक ५५ धावा , सलामीवीर यासर शेखच्या १६ चेंडूतील ४ षटकार व ४ चौकरांसह फटकावलेल्या घणाघाती नाबाद ४६ धावांमुळे नाशिकने केवळ ३.४ षटकांत पार करत ,सामन्याचे केवळ २ चेंडू बाकी असताना थरारक विजय मिळवला.

1 thought on “थरारक सामन्यात नाशिकची हिंगोलीवर मात

  1. NDCA by going digital has attained nee Heights. Focus should be given to win Invitation league so that more and more Nashik players perform well and their performance shall take them to the Ranji team.
    All the best.
    Always for Nashik.

Leave a Reply

Your email address will not be published.

X