दुसरा विजय नोंदवत नाशिक,पुण्याची आघाडी कायम

पंधरा वर्षाखालील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा : सह्याद्री कदम, ,सिध्दी पिंगळे,प्रचीती भवरची चमकदार कामगिरी

नाशिक-येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १५ वर्षांखालील मुलींच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत नाशिक,पुणे संघाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत दुसरा विजय नोंदवला.

महात्मानगर क्रिकेट मैदानावरील तिसऱ्या सामन्यात नाशिक जिल्हा संघाने सांगलीवर अटीतटीच्या लढतीत मात करत आपला लागोपाठ दूसरा विजय नोंदवला. नाशिकने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली व सायली टिळेकरच्या ३८ धावांच्या जोरावर ९ बाद १५३ धाव संख्या उभारली .प्रचिती भवर १७ व श्रुति गीतेने १४ धावा करत तिला साथ दिली. सांगलीतर्फे सह्याद्रि कदमने ३ गडी बाद केले. तर निधि शांभवी व भावी पुनमियाने प्रत्येकी २ बळी घेतले. उत्तरादाखल सह्याद्रि कदमने जोरदार ४५ धावा फटकावल्या . निधि शांभवीने २० व भावी पुनमियाने ११ धावा केल्या . पण ५ बाद १०५ व ६ बाद १३६ वरुन नाशिकच्या मुलींनी सांगलीला १४१ धावात सर्वबाद करून १२ धावांनी विजय मिळवला. नाशिकतर्फे सिध्हि पिंगळेने ३ तर प्रचिती भवर ने २ तर कार्तिकी देशमुख , अस्मिता खैरनार व निशी छोरियाने प्रत्येकी १ बळी घेतला. सिध्हि पिंगळे तसेच श्रुति गीते व सावनी निकम यांनी केलेले धावबाद व प्रचिती भवरची गोलंदाजी शेवटी निर्णायक ठरली.

पुण्याचाही सहज विजय

एस एस के मैदानावरील चौथ्या सामन्यात पुणेने परभणीवर ३२५ धावांनी मोठा विजय मिळवला .सुहानी खंडाळ च्या जोरदार नाबाद ९२ व भाविका अहिरेच्या ८० तसेच महेक मुल्लाच्या ४९ धावांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करत पुणेने ४ बाद ३५४ अशी मोठी धावसंख्या उभारली. नंतर परभणीला केवळ २९ धावात सर्वबाद करत आपला दूसरा विजय नोंदवला. पुणेतर्फे वेदिका दळवीने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत केवळ ४.३ षटकांत ५ गडी बाद केले. तिला निकिता सिंगच्या ३ व गायत्री सुर्वसेच्या १ बळी ची साथ मिळाली.

पुढील सामने :

नाशिक विरुद्ध पुणे

परभणी विरुद्ध सांगली .

Leave a Reply

Your email address will not be published.

X