नाशिकचा नंदुरबारवर १ डाव १६७ धावांनी दणदणीत विजय

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १४ वर्षांखालील ) : नैतिक घाटे व नील चंद्रात्रे यांची नाबाद शतके , देवांश गवळीचे सात बळी

नाशिक- येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय( १४ वर्षांखालील वयोगटातील )आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने नंदुरबारवर १ डाव व १६७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

र महात्मानगर क्रिकेट मैदानावर बीडने स्टार , पुणे विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले.

गोल्फ क्लबवर पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी मिळालेल्या नाशिकने नंदुरबार विरुद्ध पहिल्या डावात नैतिक घाटे नाबाद १५९ व नील चंद्रात्रे नाबाद १०० यांच्या जोरावर केवळ ४८ षटकांत २ बाद २९० अशी धावसंख्या उभारली.दोन्ही गडी सोहम पाटिलने बाद केले. उत्तरदाखल नाशिकच्या देवांश गवळीचे ५ व व्यंकटेश बेहरेच्या ३ बळींमुळे नंदुरबारचा पहिला डाव २५.३ षटकांत ५६ धावांत आटोपला. हुजेफा मर्चंट व प्रिन्स पटेलने प्रत्येकी १ गडी बाद केला. फॉलोऑन नंतरही दुसऱ्या डावात नाशिकच्या गोलंदाजांनी नंदुरबारला ३१.१ षटकांत गुंडाळून मोठा विजय मिळवून दिला. दुसऱ्या डावातही देवांश गवळीने २ व व्यंकटेश बेहरेने ३ गडी बाद करण्याची कामगिरी केली. त्यांना हुजेफा मर्चंट व नील नील चंद्रात्रेने हि २ बळी घेत छान साथ दिली . ओल्या मैदानामुळे पहिल्या दिवशी केवळ २८ षटकांचाच खेळ होऊन देखील नाशिक संघाने हे उल्लेखनीय यश मिळवले.

बीडने स्टार , पुणे विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण

महात्मानगर क्रिकेट मैदानावरील दुसर्‍या सामन्यात प्रथम फलंदाजी मिळालेल्या बीडच्या पहिल्या डावात स्टार , पुणे विरुद्ध १८९ धावा झाल्या. वेंकटेश हुरकुडेने ९५ व शौर्य जाधव ने ५२ धावा केल्या. स्टारच्या आर्यन घोडके ने ६ बळी घेतले. उत्तरदाखल स्टारने आर्यनने घोडके अष्टपैलू चमक दाखवत केलेल्या ५४ व आर्यन लोंढेच्या ४६ धावा यांच्या जोरावर १६६ पर्यंतच मजल मारल्यामुळे बीडला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळाले. महाराष्ट्रात विविध ठिकाणी ए ते आय अशा ९ गटात एकूण ३६ संघांमध्ये सदर स्पर्धा रंगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X