कुच बिहार, विजय मर्चंट स्पर्धा– महाराष्ट्रचा उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश, विजयात उचलला मोलाचा वाटा
नाशिक- बीसीसीआयच्या १९ वर्षाखालील कुच बिहार करंडक स्पर्धेत महाराष्ट्राने उपांत्य पुर्वत धडक मारली आहे. उपउपांत्य पूर्व सामन्यात नाशिकचा डावखुरा फिरकीपटू प्रतीक तिवारी यांच्या चमकदार कामगिरीने हा विजय मिळवून देण्यात महत्वपुर्ण हातभार लावला आहे.

. उप उपांत्य पूर्व सामन्यात बंगाल वरील आघाडीत नाशिकच्या डावखुरा फिरकीपटू गोलंदाज प्रतीक तिवारी याने प्रभावी कामगिरी केली. बंगाल विरुद्ध १९.२ – ४- ४१ – ३ अशी कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्र संघाला पहिल्या डावातील महत्वपूर्ण आघाडी घेत गुण मिळवता आले. उप उपांत्य पूर्व सामन्याआधीच्या शेवटच्या साखळी सामन्यात देखील प्रतीकने सिक्कीम वरील विजयात दुसऱ्या डावात केवळ दोन षटकांत ३ बळी घेत महाराष्ट्र संघाच्या विजायला हातभार लावला होताच. नाशिकचे शेखर घोष या १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. महाराष्ट्र संघ उपांत्य पूर्व फेरीत १७ डिसेंबर ला विदर्भ बरोबर सामना खेळेल.
ब्रम्हेचा,पारखच्या कामगिरीने वेधले लक्ष

१६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीत महाराष्ट्र संघाच्या त्रिपुरा संघावरील विजया पाठोपाठ ओडिशा वरील विजयात देखील साहिल पारख व दिर्घ ब्रम्हेचा यांनी फलंदाजीत प्रभावी कामगिरी केली . सुरत येथे खेळल्या जात असलेल्या बी सी सी आय च्या विजय मर्चंट ट्रॉफीत मधल्या फळीत पाचव्या क्रमांकावरील दिर्घ ब्रम्हेचाने पहिल्या डावात ६१ धावा केल्या. तर डावखुरा सलामीवीर साहिल पारखने सामन्यात ३९ व ३४ अशा धावा केल्या व महाराष्ट्र संघाने ९ गडी राखून मिळवलेल्या विजयात महत्वाचा वाटा उचलला . याआधी मध्यप्रदेश ने महाराष्ट्र संघावर पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले , त्या सामन्यातदेखील साहिल पारखने ५८ व दिर्घ ब्रम्हेचा ने ३२ धावांचे योगदान दिले होते. महाराष्ट्र संघाचा पुढील सामना १६ डिसेंबरला सिक्कीम तर आसाम बरोबर २१ डिसेंबरला होणार आहे.प्रतीक तिवारी, दिर्घ ब्रम्हेचा, साहिल पारख या उदयोन्मुख कुमार व युवा क्रिकेट खेळाडूंच्या कामगिरी बद्दल , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी तिघांचेही कौतुक करून स्पर्धेतील यापुढील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.