इंडियन ऑईल आंतरशालेय चषक: राठोड,चंद्रात्रे,तमखाने,मुथा,शेलार चमकले

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने – एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेतील २५ षटकांच्या सामन्यांच्या चौथ्या दिवशी फ्रावशी अकादमी , एस एस के ,रायन , फ्रावशी व शरद पवार इंटरनॅशनलस ,के ए सी एफ बारामती यांनी आपले सामने जिंकले.
साई राठोड , श्रावण चंद्रात्रे, सोहम तमखाने व नील चंद्रात्रेने अष्टपैलु खेळ केला . गोलंदाजीत सिद्धांत मुथा व साईराज शेलार प्रत्येकी ५ तर समकीत मुथा व श्रावण चंद्रात्रे प्रत्येकी ३ बळी घेत प्रभावी ठरले . तसेच भाविक अहिरे ,वेदांत गोरे, जिष्णू पगार व जेनील पटेल नेही अर्धशतके ठोकली.

संघाचा चुरशीचा खेळ
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब वर पहिल्या सामन्यात रायन इंटरनॅशनल ने डॉन बॉस्को वर ८ गडी राखून जोरदार विजय मिळवला. रायन इंटरनॅशनल नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले व डॉन बॉस्को ला १२७ धावात रोखले . श्रावण चंद्रात्रे ने ३ बळी घेतले . विजयासाठी १२८ धावा श्रावण चंद्रात्रे ने नाबाद ४३ धावा केल्यामुळे २ गड्यांच्या मोबदल्यात पार केल्या. सामनावीर अष्टपैलु श्रावण चंद्रात्रे .
दुसर्या सामन्यात फ्रावशी अकादमीने के के वाघ डी जी पी नगर वर वर १६५ धावांनी विजय मिळविला. फ्रावशी नाणेफेक जिंकून फलंदाजी करत ८ बाद २०३ धावा केल्या . त्यात आयुष सिंग सर्वाधिक ४५. उत्तरादाखल सिद्धांत मुथा च्या ५ व समकीत मुथा ३ बळी च्या भेदक गोलंदाजी समोर के के वाघ ला फक्त ३८ च धावा करता आल्या . सामनावीर सिद्धांत मुथा ने संदीप यूनिवर्सिटी चे रामदास डोळस यांच्या हस्ते परितोषिक स्वीकारले .
फ्रावशीचा मोठा विजय
तिसर्या सामन्यात फ्रावशी इंटरनॅशनल अकादमीने के के वाघ सी बी एस इ वर १७६ धावांनी मोठा विजय मिळविला.के के वाघ सी बी एस इ ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले पण फ्रावशी इंटरनॅशनल अकादमीने देबाशीष मोरकर ६१ व सोहम तमखाने ५२ मुळे ३ बाद २४४ अशी मजल मारली व नंतर के के वाघ ला ६८ धावांत गुंडाळले ते सोहम तमखाने, यथार्थ व ओम आगरवाल यांच्या प्रत्येकी २ बळींमुळे. सामनावीर अष्टपैलु सोहम तमखाने ने के ए सी एफन बारामती चे मुख्य प्रशिक्षक सचिन माने यांच्या हस्ते परितोषिक स्वीकारले .
बारामतीकर चमकले
चौथ्या सामन्यात के ए सी एफ , बारामतीने जे एम सी टी इंटरनॅशनल चा २१६ धावांनी दणदणीत पराभव केला. के ए सी एफने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना भाविक अहिरे ६५ व वेदांत गोरे नाबाद ६१ व ७३ अवांतर धावांच्या जोरावर ४ बाद २५१ धावा केल्या व नंतर जे एम सी टी इंटरनॅशनल ला ३५ धावात गुंडाळले ते साईराज शेलार च्या ५ बळींमुळे . सामनावीर साईराज शेलार .
महात्मा नगर मैदानावर पहिल्या सामन्यात एस एस के ने बार्न्स वर ९९ धावांनी विजय मिळविला.एस एस के चे शिवम डेरले यांच्या हस्ते झालेल्या नाणेफेकीत एस एस के ने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली व ८ बाद १७८ धावा केल्या त्या साई राठोड च्या ८६ धावांमुळे. साईने स्पर्धेतील लागोपाठ दुसरे अर्धशतक झळकावले. उत्तरादाखल साई राठोडच्याच गोलंदाजी समोर बार्न्स ला ७२ च धावा करता आल्या . सामनावीर साई राठोडने रंजन ठाकरे यांच्या हस्ते परितोषिक स्वीकारले .
दुसर्या सामन्यात शरद पवार इंटरनॅशनलने सी डी ओ मेरी वर १३७ धावांनी मात केली.शरद पवार इंटरनॅशनलने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली . जिष्णू पगार ६१ व जेनील पटेल नाबाद ५१ च्या जोरावर ५ बाद २४३ धावा केल्या. नील चंद्रात्रे ने ३ गाडी बाद केले. उत्तरादाखल सी डी ओ मेरी ३ बाद १०६ पर्यन्त च मजल मारू शकले . त्यात नील चंद्रात्रे च्या सर्वाधिक नाबाद ४१. सामनावीर जिष्णू पगारने सचिन पाटिल यांच्या हस्ते परितोषिक स्वीकारले