`बीसीसीआय`च्या एन सी ए कॅम्प साठी प्रतिक तिवारीची निवड

आमंत्रिताच्या क्रिकेट स्पर्धेतील लक्षणीय कामगिरीची दखल: विजयात उचलला महत्वपूर्ण वाटा

नाशिकच्या डावखुरा फिरकीपटू गोलंदाज प्रतीक तिवारी ह्याची १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली आहे. २४ एप्रिल ते १८ मे दरम्यान माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , होतकरू खेळाडूंसाठी हे शिबीर होणार आहे.

प्रतीकने १९ वर्षांखालील नाशिक जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करताना मागील हंगामात एप्रिल – मे २०२२ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( एम सी ए इन्विटेशन लीग ), आपल्या अचूक व भेदक गोलंदाजीने गाजविली . प्रतीकने या स्पर्धेत ५ सामन्यात तब्बल ४१ बळी मिळविले . त्याच्या जोरावर पाच साखळी सामन्यात ४ विजय मिळवत , नाशिक जिल्हा संघाने अ गट विजेतेपद पटकाविले होते . स्थानिक क्रिकेटमध्येही १९ वर्षांखालील तसेच खुल्या गटात देखील प्रतीकच्या प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन होत असते. अंतिम संघ निवडीसाठी पुणे येथे झालेल्या संभाव्य संघातील सामन्यात देखील प्रतीकने आपल्या गोलंदाजीने छाप पाडली. वेळोवेळी केलेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत केलेल्या अशा लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच यंदा प्रतीक प्रभात तिवारीची १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघात निवड झाली.

प्रतिनिधीत्व करण्यांची मिळाली संधी

प्रतीकने ऑक्टोबर २२ मध्ये एकदिवसीय विनू मंकड करंडक व डिसेंबर २२ मध्ये कुच बिहार करंडक स्पर्धेसाठी १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले . विनू मंकड करंडक स्पर्धेतील सामन्यांत जोरदार कामगिरी करून उपांत्य फेरीपर्यंत स्पर्धेत सर्वाधिक बळी घेत गोलंदाजीत प्रथम स्थान मिळवले. प्रतीकने आठ सामन्यात एकूण १६ बळी अशी अतिशय प्रभावी कामगिरी केली. सात डावात ६२ षटके , २४४ धावा, षटकामागे ३.९३ धावा देत १६ बळी हि त्याची एकंदर कामगिरी झाली . यात डावात ४ बळी घेण्याचा पराक्रम दोनदा केला. दिल्ली विरुद्धची उपउपांत्यपूर्व फेरीत ९ षटकांत २ निर्धाव ४२ धावा ४ बळी व उपांत्यपूर्व फेरीत जम्मू काश्मीर विरुद्ध १० षटकांत ४७ धावा व ४ बळी हि त्याची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

प्रभावी मारा हेच प्रतिकच्या गोलंदाजीचे वैशिष्ट्य

महाराष्ट्र संघाच्या उपांत्य फेरीपर्यंत विजयांत प्रतीकने मोठा वाटा उचलला होता .कुच बिहार करंडक स्पर्धेत देखील अतिशय प्रभावी गोलंदाजी करत महाराष्ट्र संघाला उपांत्य पूर्व फेरी दाखल होण्यात प्रतीकने मोठा वाटा उचलला , तो उप उपांत्य पूर्व सामन्यात बंगाल विरुद्ध १९.२ – ४- ४१ – ३ अशी अतिशय प्रभावी कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्र संघाला पहिल्या डावातील महत्व पूर्ण आघाडी घेत गुण मिळवता आले होते . वेळोवेळी झालेल्या अशा राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच महाराष्ट्राच्या संघापाठोपाठ आता प्रतीकची एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील खास शिबिरासाठी निवड झाली निवड झाली आहे.

नाशिकच्या क्रिकेट विश्वात आनंदाचे वातावरण

प्रतीकच्या या अतिशय महत्वाच्या शिबिरासाठी झालेल्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतीकचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

1 thought on “`बीसीसीआय`च्या एन सी ए कॅम्प साठी प्रतिक तिवारीची निवड

Leave a Reply

Your email address will not be published.

X