
नाशिक- आपल्च्याया नाशिकचा डावखुरा फिरकीपटू गोलंदाज प्रतीक तिवारी याने १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – च्या विनू मंकड करंडक स्पर्धेतील सामन्यांत जोरदार कामगिरी करून उपांत्य फेरीपर्यंत स्पर्धेत सर्वाधिक बळी घेत गोलंदाजीत प्रथम स्थान मिळवले. या त्यांच्या कामगिरीमुळे तो सर्वीत्तम गोलंदाज ठरला आहे.
प्रतीकने आठ सामन्यात एकूण १६ बळी अशी अतिशय प्रभावी कामगिरी केली. सात डावात ६२ षटके , २४४ धावा, षटकामागे ३.९३ धावा देत १६ बळी हि त्याची एकंदर कामगिरी झाली . यात डावात ४ बळी घेण्याचा पराक्रम दोनदा केला. दिल्ली विरुद्धची उपउपांत्यपूर्व फेरीत ९ षटकांत २ निर्धाव ४२ धावा ४ बळी व उपांत्यपूर्व फेरीत जम्मू काश्मीर विरुद्ध १० षटकांत ४७ धावा व ४ बळी घेतले.
या मोसमातील सर्वीत्तम कामगिरी
प्रतिकने स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. महाराष्ट्र संघाच्या विजयांत प्रतीकने मोठा वाटा उचलला . महाराष्ट्र संघाने ५ पैकी ३ सामने जिंकुन बाद फेरीत प्रवेश केला. एका सामन्यात पराभव व एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. बाद फेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत दिल्लीवर व त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत जम्मू काश्मीर वर विजय मिळविले. उपांत्य फेरीत मात्र विदर्भ संघाने महाराष्ट्रावर मात केली व संघाची आगेकूच थांबवली . नाशिकचे शेखर घोष यांनी या १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली . प्रतीकच्या या लक्षणीय कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतीकचे अभिनंदन करून यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत