
नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सागर देशमुख यांची बी सी सी आय च्या वरिष्ठ महिला स्पर्धेसाठी क्रिकेट संघाच्या कामगिरीचे व्हिडीओ विश्लेषक म्हणून नियुक्ती झाली आहे.
सागर देशमुख हे बीसीसीआय चे व्हिडिओ अनेलेसिस्ट आहेत. बीसीसीआय च्या वतीने होणाऱ्या सामन्यांसाठी ते कामगिरी करत असतात. यंदा प्रथमच सागर देशमुख पूर्व विभागाच्या संघाचे व्हिडिओ अनेलेसिस्ट म्हणून काम बघणार आहे.
पूर्व विभागाच्या वरिष्ठ महिला संघासाठी सदर नेमणूक झाली आहे. लखनौ येथे ८ ते १६ नोव्हेंबर दरम्यान बी सी सी आय आयोजित वरिष्ठ महिला संघाच्या आंतर विभागीय टी-ट्वेंटी ट्रॉफी २०२२ – २३ स्पर्धेकरिता सागर देशमुख काम पहात आहेत.
या नेमणुकीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी सागर देशमुख यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.