
सातत्याने सरावाचा झाला फायदा-नवोदीतांना होणार मदत
नाशिक– जिल्हा क्रिकेट संघटनेच्या महिला खेळाडु संघ प्रशिक्षक भावना गवळी या आता बी सी सी आय लेव्हल १ प्रशिक्षक असतील. नाशिकसाठी खास आनंदाची व अभिमानाची गोष्ट म्हणजे हि बी सी सी आय लेव्हल १ प्रशिक्षकाची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या नाशिकच्या पहिल्याच महिला क्रिकेट प्रशिक्षक ठरल्या आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – च्या माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – बेंगळुरू तर्फे झालेल्या लेव्हल १ चा अभ्यासक्रम भावना गवळी यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे, असे एन सी ए तर्फे कळवण्यात आले आहे. गेल्या सोळा वर्षांपासून भावना गवळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर नाशिकच्या महिला क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देत आहेत. त्या रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल मध्ये ही क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम करतात. भावना गवळी यांनी महाराष्ट्र महिला वरिष्ठ संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे.
सातत्याचा फायदा
भावना गवळी ह्या महाराष्ट्राच्या माजी क्रिकेटपटु आहेत. 1991 ते 1999 दरम्यान त्यांनी महाराष्ट्र महिला वरिष्ठ संघाबरोबरच, पश्चिम विभागाचे ही प्रतिनिधित्व केले. ऑल इंडिया इंडियन युनिवर्सिटी पातळीवर ही त्या क्रिकेट खेळल्या आहेत.
ह्या यशाबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भावना गवळी यांचे खास अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
खूपच छान
महिला क्रिकेटपटू यांना मार्गदर्शन मिळेल
thank u very much