महाराष्ट्र संभाव्य क्रिकेट संघात नाशिकचे चौघे

नाशिक-नव्या २०२२-२३ हंगामासाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध संभाव्य संघात नाशिकच्या १९ वर्षाखालील आणखी ४ खेळाडूंची भर पडली आहे. रणजीपटू सत्यजित बच्छाव व्यतिरिक्त एकूण २२ खेळाडूंची १९ वर्षाखालील तसेच खुल्या वयोगटात , निवड झाली आहे.

नाशिकच्या खेळाडूंनी आपली घौडदौड सुरुच ठेवली आहे. सर्वीत्तम कामगिरीच्या जोरावर ही निवड झाली आहे. या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे :

१९ वर्षाखालील –

पुरुष : १- शर्विन किसवे २-अथर्व चौधरी

महिला : १- रसिका शिंदे महिला वरिष्ठ संघ
२ – प्रियंका पवार 19 वर्षा खालील संघ

शर्विन उदय किसवे याने महाराष्ट्र संघातर्फे १९ वर्षांखालील बीसीसीआय च्या कुच बिहार करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी शर्विनची निवड झाली होती. तर रसिका शिंदेने देखील महाराष्ट्रातर्फे एकोणीस वर्षांखालील महिला ५० षटकांच्या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व केले आहे.

यापूर्वीच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी झालेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत या सर्वच खेळाडूंनी केलेल्या कामगिरीच्या जोरावरच हि महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड झाली आहे.या होतकरू, उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंचे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या क्रिकेटपटूंचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

X