महाराष्ट्र संभाव्य संघात नाशिककरांचा दबदबा

९पुरुष, ८ महिला खेळाडूंची निवड

नाशिक- नाशिकच्या क्रिकेट प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नव्या २०२२-२३ हंगामासाठी नाशिकच्या ९ पुरुष व ८ महिला खेळाडूंची १९ वर्षाखालील तसेच खुल्या वयोगटात निवड झाली आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विविध संभाव्य संघात निवड ही झाली आहे.

निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे :

१९ वर्षाखालील –

पुरुष : १- साहिल पारख २- ऋषिकेश कातकाडे ३- प्रतिक तिवारी व ४- रविंद्र मत्च्या.

महिला : १- ईश्वरी सावकार २- शाल्मली क्षात्रिय ३- अनन्या साळुंखे ४- पल्लवी बोडके .

वरिष्ठ खुला गट :

महिला : १ – माया सोनवणे २- साक्षी कानडी ३- प्रियांका घोडके व ४- लक्ष्मी यादव .

पुरुष : १ – मुर्तुझा ट्रंकवाला २- यासर शेख ३- तेजस पवार ४- कुणाल कोठावदे व ५-तन्मय शिरोडे .

रणजीपटू सत्यजित बच्छावही कायम

नाशिकचा रणजीपटू महाराष्ट्र संघाचा मुख्य खेळाडू सत्यजित बच्छाव अर्थातच आहेच . जो सध्या पश्चिम विभाग संघातर्फे दुलिप ट्रॉफी साठी खेळायला गेला आहे.

यापूर्वीच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी झालेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत या सर्वच खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी केली आहे. त्या प्रभावी कामगिरीच्या जोरावरच हि महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड झाली आहे. खुल्या गटातील सर्वांनीच या आधीही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहेच. अंतिम संघ निवडीसाठी शनिवारी (ता. २४) पुणे येथे चाचणी स्पर्धा सामन्यांत भाग घेण्यासाठी नाशिकचे वरील सर्व खेळाडू रवाना होत आहेत.

ह्या सर्व होतकरु, उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंच्या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत अतिशय आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या क्रिकेटपटूंचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X