राज्य आमंत्रिताच्या स्पर्धेसाठी अठरापासून जिल्हा संघ निवड चाचणी

१९ वर्षांखालील क्रिकेटपटूंना जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधीः सतरा मार्चपर्यत नाव नोंदणी आवश्यक

नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्पर्धा होणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी शनिवार(ता. १८) व रविवार (ता. १९) ला हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ( गोल्फ क्लब) येथे निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येणार आहे.

या चाचणीमध्ये १ सप्टेंबर २००४ ( ०१/०९/२००४ ) नंतर जन्मलेल्या खेळाडूंना सहभागी होता येईल. इच्छुक खेळाडूंनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथील कार्यालयात कामकाजाच्या वेळेत शुक्रवार दिनांक १७ मार्च पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे, ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी. संघ निवड चाचणी शुल्क प्रत्येकी तीनशे रुपये आहे. निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.

नावे नोंदविलेल्या खेळाडूंनी क्रिकेट पोशाखात , स्वतःच्या क्रिकेट साहित्यासह १८ मार्च रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब वर सकाळी साडेनऊ ( ०९३० ) वाजता हजर रहावे. असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

X