विनू मंकड स्पर्धेतील महाराष्ट्राच्या विजयात नाशिकच्या प्रतिकचा मौल्यवान वाटा

मुंबई, वडोदरा,छत्तीसगडविरूध्द प्रभावी कामगिरीः उपउपांत्य फेरीत दिल्लीशी गाठ

नाशिक- नाशिकचा डावखुरा फिरकीपटू गोलंदाज प्रतीक तिवारी याने प्रभावी कामगिरी करून १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या विजयांत मोठा वाटा उचलला. हरियाणात झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआयच्या विनू मंकड करंडक स्पर्धेतील साखळी सामन्यांतील या यशामुळे महाराष्ट्र संघाने उप उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

    पहिल्या सामन्यातील मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर पुढचे गुजरात, वडोदरा  व छत्तीसगड हे तीनही ५० षटकांचे मर्यादित एकदिवसीय सामने महाराष्ट्र संघाने जिंकले. एकूण पांच पैकी तीन सामने जिंकले,  एकात पराभूत तर एक पावसामुळे रद्द झाला.

प्रतिकची सर्वीत्तम कामगिरी

    प्रतिक तिवारीने मुंबईविरुद्ध १ बळी तर वडोदरा विरुद्ध १० षटकांत २ निर्धाव १८ धावा व ३ बळी , छत्तीसगड विरुद्ध १० षटकांत २ निर्धाव १४ धावा व ३ बळी अशी जोरदार कामगिरी केली. त्यामुळे वडोदरा व छत्तीसगड या दोन्ही संघांविरुद्ध  महाराष्ट्राने  ७ गडी राखून मोठे विजय मिळविले व बाद फेरीत प्रवेश केला. सोमवार (ता.१७) अल्लेपी( केरळ) येथे  उपउपांत्य फेरीत  महराष्ट्राचा सामना दिल्लीशी होणार आहे. शर्विन किसवे हादेखील या संघात असून , नाशिकचे शेखर घोष या १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक आहेत.

एनडीसीएमध्ये उत्साहाचे वातावरण

या कामगिरीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतीकचे अभिनंदन करून यापुढील स्पर्धेतील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

X