सिंबायोसिस,डी पी एस ,पंचवटी ,अशोका ,गुरु गोविंदची विजयी घौडदौड

इंडियन ऑईल आंतरशालेय चषक: सोनवणे,चतुर्वेदीची नाबाद शतके,गोलंदाजीत देवरे,गाडेकर पाटील प्रभावी

इंडियन आयल चे सर व्यवस्थापक गिरिराज यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणारा वेद सोनवणे सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना शेजारी असोसिएशनचे सचिव समीर रकटे आदी

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने – एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सुरु असलेल्या इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेतील सामन्याच्या दुसर्‍या दिवशी सिंबायोसिस , पंचवटी इंग्लिश , रासबिहारी इंटरनॅशनल, गुरु गोविंद यांनी आपआपले सामने जिंकले. वेद विजय सोनवणेच्या ५१ चेंडूत घणाघाती नाबाद १३० धावांच्या जोरावर हा विजय संपादन केले. त्याने ६ षटकार व १८ चौकार खेचत आजचा दिवस गाजवला . आर्यव चतुर्वेदी नेही नाबाद १०८ धावा केल्या . तसेच अर्णव दशपुते , सत्यम येवला , आर्य खोडके ,आर्यव चतुर्वेदी , साहिल झोलेकर यांनी पण फलंदाजीत प्रभावी कामगिरी केली .तर गोलंदाजीत वेदांत देवरे, पुष्प गाडेकर, दिग्विजय पाटील प्रभावी ठरले .
इंडियन आयल चे सर व्यवस्थापक गिरिराज यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आले
गोल्फ वर पहिल्या सामन्यात सिंबायोसिस ने के के वाघ वर २९५ धावांनी विजय मिळविला . के के वाघ , सरस्वती नगर ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले , सिंबायोसिस ने २५ षटकांत ३ बाद ३२३ – वेद सोनवणे नाबाद १३०, अर्णव दशपुते ६१, सत्यम येवला ५८ धावा केल्या .उत्तरादाखल के के वाघ : १३.१ षटकात सर्वबाद ३७ च धावा करू शकले. , वेदांत देवरे ने ३ तर आयुष वसईकर व अर्णव दशपुते प्रत्येकी २ बळी घेतले.

डीपीएसचा दणदणीत विजय

दुसर्‍या सामन्यात डी पी एस ने रासबिहारी इंटरनॅशनल वर ९ गडी राखून विजय मिळविला. डी पी एस ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले . रासबिहारीने २५ षटकांत ६ बाद १२४ धावा केल्या. आशिष सिंग ३०. उत्तरादाखल डी पी एस ने आर्य खोडके ५० व जीत मोदी नाबाद ३३ यांच्या फलंदाजीमुळे १८.३ षटकांत १ बाद १२६ करून विजय मिळवला .तिसर्‍या सामन्यात पोदार विरुद्ध फ्रावशी अकादमी ला पुढे चाल मिळाली .

गुरुगोविंद सिंग स्कूलची आघाडी

चौथ्या सामन्यात गुरु गोविंद ने ज्ञानज्योत अकादमीविरुद्ध २२९ धावांनी विजय मिळविला .ज्ञानज्योत अकादमी ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले . गुरु गोविंद ने आर्यव चतुर्वेदी च्या नाबाद १०८ व साहिल झोलेकर ६१ धावांमुळे २५ षटकांत ३ बाद २९४ धावा केल्या. उत्तरादाखल ज्ञानज्योत अकादमी संघ ६५ च धावा करू शकला.

पंचवटी इंग्लिश स्कूलची अभिनववर मात

महात्मा नगर मैदानावर पहिल्या सामन्यात पंचवटी इंग्लिश मीडियम ने अभिनव मराठी वर ७ गडी राखून विजय मिळवला . अभिनव मराठी ने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली व २५ षटकांत ७ बाद १०५ धावा केल्या त्यात सोहम पेंठार च्या २७. शिवम रस्तोगी ने २ बळी घेतले. पंचवटी इंग्लिश मीडियम ने १८.४ षटकांत ३ बाद १०८ केल्या त्या अवांतर ८३ धावांच्या मदतीने.

अशोकाची एस्पिलरवर सात गडी राखून विजय

दुसर्‍या सामन्यात अशोका वडाळाने एस्पालियर वर ७ गडी राखून विजय मिळवला . अशोका वडाळा ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले . एस्पालियर ने २0.2 षटकांत सर्वबाद ८२ केल्या त्यात अंशुमन नाबाद १९ . अशोका च्या दिग्विजय पाटील ३ तर आर्यन कापसे २ बळी घेतले. नील इंगळे ने ३५ व अर्णव तांबट ने २१ धावा करून दहाव्या षटकातच ८६ धावा केल्या व संघाला विजयी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

X