बिहार,अरुणाचलवरील विजयात उचलला मोलाचा वाटाः पहिल्या डावात तीन,दुसऱ्या डावात एक बळी मिळवला

नाशिक- नाशिककर पवन सानप याने २५ वर्षांखालील वयोगटात महाराष्ट्र संघातर्फे बिहार या दोन संघावरील मोठ्या विजयात गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात तीन तर दुसऱ्या डावातच एक गडी बाद केला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे , पुणे येथील स्टेडियम वर चार दिवसीय साखळी सामन्यात महाराष्ट्राने बिहार वर एक डाव व १४२ धावांनी मोठा विजय मिळवला . आपल्या डावखुरया जलदगती गोलंदाजीने पवन सानपने पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात १ गडी बाद केला . बिहारच्या पहिल्या डावात ८ षटकांत २४ धावांत ३ बळी मिळवले , तर दुसऱ्या डावात ११ षटकांत २४ धावांत १ बळी मिळवत संघाच्या विजयात हातभार लावला. याआधीच्या आणंद येथे झालेल्या सामन्यात अरुणाचल प्रदेश विरुद्ध विजयाला हातभार लावताना पहिल्या डावात ७ षटकांत २७ धावांत २ बळी मिळवले होते व दुसऱ्या डावातही प्रभावी गोलंदाजी केली. अरुणाचल प्रदेश विरुद्धही महाराष्ट्राने एक डाव व ३२५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पवनचे अभिनंदन करून स्पर्धेतील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक व निकाल –
महाराष्ट्र वि बिहार – महाराष्ट्र – पहिला डाव ५ बाद ५८१ वि बिहार – पहिला डाव सर्व बाद १९६ व दूसरा डाव – सर्व बाद २४३ .
महाराष्ट्रा एक डाव व १४२ धावांनी विजयी .
महाराष्ट्र वि अरुणाचल प्रदेश – महाराष्ट्र – पहिला डाव ३ बाद ४३४ वि अरुणाचल प्रदेश – पहिला डाव सर्व बाद ४९ व दूसरा डाव – सर्व बाद ६० .
महाराष्ट्रा एक डाव व ३२५ धावांनी विजयी .
महाराष्ट्राचे पुढील सामने- २९ जानेवारी – गुजराथ ,५ फेब्रुवारी – चांदिगड १२ फेब्रुवारी – आंध्र .