राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा : पाच बळी मिळवत समकीत सुराणाची सर्वीत्तम कामगिरी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणर्या १६ वर्षांखालील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट सुपर लीग (इन्व्हिटेशन सुपर लीग ) स्पर्धेत दिर्घ ब्रम्हेचाच्या नाबाद १५१ व समकीत सुराणा ५ बळी यांच्या जोरदार कामगिरीच्या जोरावर नाशिक ने पहिल्या डावात अंबिशियस, पुणे संघावर १६७ धावांची मोठी आघाडी घेतली. पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत या दोन दिवसीय कसोटी सामन्यात पहिल्या डावाच्या आघाडीचे गुण घेतले.

अंबिशियस, पुणेने नाणेफेक जिंकून नाशिक ला प्रथम फलंदाजी दिली . १६ वर्षांखालील नाशिक जिल्हा संघाने त्याचा जोरदार फायदा उठवत चौथ्या क्रमांकावरील दिर्घ ब्रम्हेचाच्या नाबाद १५१ व त्यास साई राठोड ८५ तसेच साहिल पारख व कृष्णा केदार प्रत्येकी ५३ अशी छान साथ मिळाल्यामुळे केवळ ६५ षटकांत ५ बाद ४२७ अशी जोरदार धावसंख्या उभारली . उत्तरादाखल नाशिकचा डावखुरा फिरकीपटू समकीत सुराणाच्या ५ बळींमुळे अंबिशियस, पुणे ७४.५ षटकांत २६० पर्यंतच मजल मारू शकला . समकीतला जलदगती कृष्णा केदारच्या तीन बळींची छान साथ मिळाली. दुसर्या डावात नाशिकने ३४.१ षटकांत १८३ धावा फटकावल्या व अनिर्णीत सामन्यात पहिल्या डावाच्या आघाडीचे गुण घेतले.
दिर्घ ब्रम्हेचा व समकीत सुराणाचे छायाचित्र सोबत पाठवत आहे.