राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा- ज्ञानदीप गवळी ९६ , ऋग्वेद जाधव ८८,सामन्यात मंथन पिंगळे ७,व्यंकटेश बेहरे व नील चंद्रात्रे ४ बळी

नाशिक-पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात सुपरलीग फेरीत नाशिकने ७ स्पोर्ट्स स्पार्क, पुणेवर पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले. फलंदाजीत ज्ञानदीप गवळी ९६, ऋग्वेद जाधव ८८ तर गोलंदाजीत सामन्यात मंथन पिंगळेने ७ व व्यंकटेश बेहरेने ४ बळी घेतले . नील चंद्रात्रेने ४४ धावा व सामन्यात ४ बळी अशी अष्टपैलू चमक दाखवली.
सर्वीत्तम कामगिरीची नोंद
पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी मिळालेल्या नाशिकने पहिल्या डावात ७३.१ षटकांत सर्वबाद ३१५ धावा केल्या. त्यात ज्ञानदीप गवळी ९६, ऋग्वेद जाधव ८८ व नील चंद्रात्रेने ४४ धावा केल्या. उत्तरदाखल ७ स्पोर्ट्स स्पार्कचा पहिला डाव मंथन पिंगळे ४ , व्यंकटेश बेहरे ३ , नील चंद्रात्रे २ व हुजेफा मर्चंट १ बळी यांच्या गोलंदाजी समोर सर्वबाद १६३ इतकीच मजल मारू शकला. फॉलोऑन नंतरही दुसऱ्या डावात ६ बाद ११५ अशा स्थितीत निर्णायक पराभव टाळण्यात ७ स्पोर्ट्स स्पार्क यशस्वी झाले. दुसऱ्या डावात मंथन पिंगळेने ३ , नील चंद्रात्रे २ व व्यंकटेश बेहरेने १ बळी घेतला.