सेंट फ्रांसिस , मराठा व विस्डम इंटरनॅशनल विजयी

इंडियन ऑईल आंतरशालेय चषक-साहिल पारख नाबाद १७०, आर्यन घोडके ५ बळी

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने – एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेत सातव्या दिवशी सेंट फ्रांसिस, राणे नगर, मराठा हाय स्कूल व विस्डम इंटरनॅशनल यांनी आपले सामने जिंकले. फलंदाजीतील विस्डम इंटरनॅशनलचा कर्णधार साहिल पारखच्या घणाघाती नाबाद १७० धावा व मराठा हायस्कूलच्या आर्यन घोडकेने ५ बळी घेत यांनी सातवा दिवस गाजवला . विस्डमच्या सरूप घोष व सिंबायोसिसच्या अर्णवने ही प्रत्येकी ३ गडी बाद केले.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब वर पहिल्या सामन्यात सेंट फ्रांसिस राणे नगर ने के के वाघ गंगापूर वर चुरशीच्या लढतीत ५ गडी राखून विजय मिळवला.प्रथम फलंदाजी मिळालेल्या के के वाघ ने सर्वबाद ८२ धावा केल्या . सामनावीर पार्थ अंभोरेने के के वाघ च्या फलंदाजीवर अंकुश ठेवत १ गडी बाद केला . रितेश पाटीलने नाबाद सर्वाधिक १६ धावा केल्या . उत्तरादाखल सेंट फ्रांसिस राणे नगर ने विजयासाठीच्या ८३ धावा , सलामीवीर यत्नेश संधानच्या १८ धावांमुळे ५ गडी गमावत पार केल्या .

मराठा हायस्कूल ने सिंबायोसिस वर ४९ धावांनी विजय

प्रथम फलंदाजी मिळालेल्या मराठा हायस्कूलने सांघिक प्रयत्नाने ६० अवांतर धावांच्या मदतीने १३५ धावा केल्या . सिंबायोसिसच्या अर्णव ने ३ गडी बाद केले. उत्तरादाखल सिंबायोसिसच्या कर्णधार अर्णव दशपुतेच्या ३८ धावांना इतरांची साथ न मिळाल्यामुळे , मराठा च्या सामनावीर आर्यन घोडकेने ५ बळी घेत ८६ धावातच रोखले.

विस्डम इंटरनॅशनलने स्वामी नारायण वर १४० धावांनी दणदणीत विजय मिळविला

प्रथम फलंदाजी मिळालेल्या विस्डम इंटरनॅशनलने सामनावीर कर्णधार साहिल पारखच्या केवळ ५६ चेंडूतील ११ षटकार व २१ चौकारांसह केलेल्या घणाघाती नाबाद १७० धावांच्या जोरावर निर्धारित १५ षटकांत १ बाद २३० अशी प्रचंड धावसंख्या उभारली. उत्तरादाखल स्वामी नारायण ५ बाद ९० इतकीच मजल मारू शकले. सरूप घोषने ३ बळी घेत गोलंदाजीत चमक दाखविली.

Leave a Reply

Your email address will not be published.

X