सेंट फ्रांसिस ,लॉरेन्स, के के वाघ , मराठा , डी पी एस, फ्रावशी विजयी

चिन्मय भास्करचे हॅट्रिकसह ६ बळी, मंथन पिंगळेचे ७ बळी,प्रणव येवले, यत्नेश संधानची सर्वीत्तम खेळी

नाशिक-जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने – एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेतील २५ षटकांच्या सामन्यांच्या सहाव्या दिवशी सेंट फ्रांसिस राणे नगर , सेंट लॉरेन्स, के के वाघ गंगापूर , मराठा , डी पी एस व फ्रावशी अकादमी यांनी आपले सामने जिंकले.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब वर पहिल्या सामन्यात सेंट फ्रांसिस राणे नगर ने के एन केला वर १० गडी राखून विजय मिळवला.

के एन केला ने प्रथम फलंदाजी करत १११ धावा केल्या . सेंट फ्रांसिस राणे नगर ने सामनावीर यत्नेश संधान च्या नाबाद ६१ धावांच्या जोरावर १० गडी राखून आरामात विजयी लक्ष्य पार केले.

दुसर्‍या सामन्यात पंचवटी इंग्लिश वर के के वाघ गंगापूर ने ६गडी राखून विजय मिळवला.

के के वाघ चा सामनावीर रुद्राक्ष सोनवणे ने ३ बळी घेत पंचवटी इंग्लिश ला १२५ धावात रोखले व नंतर मानस हेमबाडे च्या नाबाद ४६ धावांच्या जोरावर ४ बाद १२६ धावा केल्या.

लॉरेन्सचा मोठा विजय

तिसर्‍या सामन्यात सेंट लॉरेन्स ने रायन इंटरनॅशनल २२२ धावांनी मोठा विजय मिळविला .

सलामीवीर प्रणव येवले च्या नाबाद शतकाच्या जोरावर सेंट लॉरेन्स ने २५३ धावांचा डोंगर उभारला. व नंतर सामनावीर चिन्मय भास्कर च्या भेदक गोलंदाजीने एका हॅट्रिक सह ६ बळी घेत रायन इंटरनॅशनल ला केवळ ३१ धावांत गुंडाळले .

मराठाचा सहज विजय

चौथ्या सामन्यात मराठा ने होरायजन आय सी एस ई वर ९ गडी राखून विजय मिळवला .प्रथम फलंदाजी करणार्‍या होरायजन ला मराठाच्या सामनावीर मंथन पिंगळेच्या जोरदार ७ बळींमुळे ९९ धावांपर्यंत च मजल मारता आली . नंतर सलामीच्या ज्ञानदीप गवळीच्या नाबाद ४४ मुळे १०० धावांचे लक्ष्य सहज पार केले.

महात्मा नगर मैदानावर पहिल्या सामन्यात डी पी एस ने गोल्डन होरायजन वर ८ गडी राखून विजय मिळवला.

अखेर फ्रावशी अँकेडमी विजयी

प्रथम फलंदाजी करणार्‍या गोल्डन होरायजनला डी पी एस च्या सामनावीर हिरेन पहुजा च्या ४ बळींमुळे १०१ धावांपर्यंत मजल मारता आली . विजयासाठीच्या १०२ धावा सलामीवीर आर्य खोडकेच्या ४२ धावांमुळे केवळ २ गडी गमावत पार केल्या.

दुसर्‍या सामन्यात फ्रावशी अकादमीने अशोका वडाळा वर मात केली . फ्रावशी अकादमीने प्रथम फलंदाजी करून अशोकाला १४३ धावांचे लक्ष्य दिले . उत्तरादाखल अशोकाची ९ बाद ९२ अशी अवस्था असताना जोरदार पावसामुळे सामना थांबवत , स्पर्धा नियमांनुसार फ्रावशी अकादमीला विजयी घोषित करण्यात आले. फ्रावशीचा २ बळी घेणारा शायान खान सामनावीर ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published.

X