सेंट फ्रान्सिस,विस्डम, फ्रावशी, स्वामी नारायण, शरद पवार इंटरनॅशनल विजयी

इंडियन ऑईल आंतरशालेय चषक-गोलंदाजीत नेमातुल्लाह शेखची हॅट्रिक, अर्जुन गायकवाड,यत्नेश संधान,नील दिक्षित चमकले

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्ताने – एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात येत असलेल्या इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेतील सामने पावसाच्या दोन दिवसांच्या व्यत्ययानंतर आज झाले. आजच्या सामन्यात सेंट फ्रांसिस – राणेनगर , विस्डम इंटरनॅशनल स्कूल व फ्रावशी इंटरनॅशनल अकादमीने आपले सामने जिंकले. फलंदाजीत यत्नेश संधान ५४, अर्जुन उचित नाबाद ८२ , नील दिक्षित नाबाद ७४ व मोहित कटारिया ६६ चमकले तर गोलंदाजीत नेमातुल्लाह शेखची हॅट ट्रिक वैशिष्ठ्यपूर्ण ठरली. अर्जुन गायकवाडने ३ तर यत्नेश संधानने ही २ बळी घेतले .

संक्षिप्त धावफलक व निकाल :

१- सेंट फ्रांसिस राणेनगर वि होरायझन अकादमी – होरायझन अकादमी ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले .

सेंट फ्रांसिस – २० षटकांत ३ बाद १५७ – यत्नेश संधान ५४ , ओम भामरे ४०.

होरायझन अकादमी -१२.५ षटकांत सर्वबाद ५३ – यत्नेश संधान व निखिल पाटिल प्रत्येकी २ बळी.

सेंट फ्रांसिस , राणेनगर १०४ धावांनी विजयी .

२ – विस्डम इंटरनॅशनल स्कूल वि न्यू एरा – न्यू एरा ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले .

विस्डम इंटरनॅशनल -१५ षटकांत ५ बाद १४२ – मोहित कटारिया ६६, साहिल पारख २६. काव्य कोठावदे २ बळी .

न्यू एरा -१५ षटकांत ४ बाद ६८ – युवराज पाटे नाबाद २१.

विस्डम इंटरनॅशनल स्कूल ७४ धावांनी विजयी .

-फ्रावशी इंटरनॅशनल अकादमी वि योगेश्वर विद्यालय डावचवाडी – योगेश्वर विद्यालय ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले .

फ्रावशी – २० षटकांत ३ बाद २०५ – अर्जुन उचित नाबाद ८२ , नील दिक्षित नाबाद ७४.आदित्य शिंदे २ बळी.

योगेश्वर विद्यालय – १८.५ षटकांत सर्वबाद ७९ – अनिकेत गांगुर्डे २३. अर्जुन गायकवाड ३ व श्वेतांग चतुर्वेदी २ बळी .

फ्रावशी इंटरनॅशनल अकादमी १२६ धावांनी विजयी .

४- उदोजी होरायझन वि स्वामी नारायण – उदोजी होरायझन ने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली .

उदोजी होरायझन – २० षटकांत ५ बाद १०७ – विराट संघवी ३५.

स्वामी नारायण – १३.४ षटकांत – ४ बाद १११ -अवांतर ४२, श्लोक पवार १४, रोहित जाधव १० .

स्वामी नारायण ६ गडी राखून विजयी .

५ – किलबिल सेंट जोसेफ वि शरद पवार इंटरनॅशनल – शरद पवार इंटरनॅशनल ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले .

किलबिल सेंट जोसेफ – १५ षटकांत ६ बाद ९० – ऋग्वेद जाधव ३४,रक्षित शेवाळे २३. नेमातुल्लाह शेख हॅट ट्रिक सह ३ बळी .

शरद पवार इंटरनॅशनल – ११.४ षटकांत ३ बाद ९४ – अवांतर ५४ .

शरद पवार इंटरनॅशनल ७ गडी राखून विजयी .

Leave a Reply

Your email address will not be published.

X