सेंट लॉरेन्स,के ए सी एफ अंतिम फेरीत

इंडियन ऑईल चषक-फलंदाजीत वेदांत देवडे , भाविका अहिरे ,साहिल पारख,गोलंदाजीत आदित्य राठोड,राजवीर बोथरा चमकले

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) च्या सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने – एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे सुरु असलेल्या इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेत सेंट लॉरेन्स व के ए सी एफ , बारामती या संघानी पात्रता फेरीचे सामने जिंकून अंतिम फेरी गाठली.

फलंदाजीत के ए सी एफ , ची सलामीवीर जोडी वेदांत देवडे ९६, भाविका अहिरे ८७ यांनी तर गोलंदाजीत सेंट लॉरेन्सच्या आदित्य राठोड च्या ७ व विस्डम इंटरनॅशनल राजवीर बोथरा च्या ५ बळींनी नववा दिवस गाजवला . दहावा दिवस फलंदाजीत के ए सी एफचा सलामीवीर वेदांत देवडेचे लागोपाठ दुसरे अर्धशतक , वेदांत गोरेच्या नाबाद ४४ व विस्डम इंटरनॅशनल तर्फे स्पर्धेत दोन जोरदार शतके झळकवलेल्या कर्णधार साहिल पारखची ७७ धावांची अपयशी झुंज यांनी तर गोलंदाजीत के ए सी एफ चा सामनावीर दक्ष किरोडिअनच्या महत्वाच्या ३ बळींना, आर्य कुमावतच्या ४ बळींची साथ यांनी दहावा दिवस गाजवला .

सेंट लॉरेन्सचा सहज विजय

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब वर पात्रता फेरीच्या पहिल्या कमी धावसंख्येच्या चुरशीच्या सामन्यात सेंट लॉरेन्सने विस्डम इंटरनॅशनल वर २ गडी राखून विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना विस्डम इंटरनॅशनल ची २ बाद २१ अशी सुरुवात झाली . त्यानंतर मात्र सामनावीर डावखुरा मंदगती सेंट लॉरेन्सच्या आदित्य राठोडच्या अतिशय भेदक गोलंदाजी समोर अजिबात टिकाव न लागल्यामुळे ५३ धावांवर सर्वबाद झाले . आदित्य राठोडने ६ षटकांत केवळ ७ धावा देत तब्बल ६ गडी बाद केले. उत्तरादाखल सेंट लॉरेन्सला विजयासाठी ५४ धावा करताना विस्डमच्या राजवीर बोथराच्या ५ बळींमुळे चांगलेच झगडावे लागले. नवव्या क्रमांकावरील कर्णधार आयुष काटकरच्या नाबाद ११ व २२ अवांतर धावांमुळे सेंट लॉरेन्स विजयी झाले.

केएसीएफची सेंट फ्रान्सीसवर मोठा विजय

एलिमिनेटर सामन्यात के ए सी एफ , बारामतीने सेंट फ्रांसिस ,राणे नगर वर २०८ धावांनी मोठा विजय मिळवला .प्रथम फलंदाजी करताना के ए सी एफ , बारामतीच्या वेदांत देवडे व भाविका अहिरे या सलामीच्या जोडीने केवळ २५ षटकांत २१३ धावांची जोरदार भागीदारी केली , त्या जोरावर के ए सी एफ ने २९१ धावा केल्या. उत्तरादाखल के ए सी एफ च्या गोलंदाजांनी सांघिक प्रयत्नाने सेंट फ्रांसिस, राणे नगर ला ८३ धावात गुंडाळले. यत्नेश संधानने सर्वाधिक २४ धावा केल्या.

दुसर्‍या क्वालीफायर सामन्यात के ए सी एफ , बारामतीने विस्डम इंटरनॅशनलवर ३४ धावांनी विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी मिळालेल्या के ए सी एफ , बारामतीने ३० षटकांत ६ बाद १७५ पर्यंत मजल मारली ती वेदांत देवडेच्या ६१ धावांना दूसरा वेदांत कर्णधार वेदांत गोरेने नाबाद ४४ ची साथ दिल्यामुळे . विस्डमच्या सरूप घोषने ६ षटकात सर्वात कमी २६ धावा देत १ गाडी बाद केला. उत्तरादाखल विस्डम इंटरनॅशनलची २ बाद ३८ , ३ बाद ५४ अशी सुरुवात झाली . दुसर्‍या बाजूने सलामीवीर कर्णधार साहिल पारख नेहमीच्या आक्रमक शैलीत फलंदाजी करत राहिला , पण वैयक्तिक ७७ धावांवर के ए सी एफ चा गोलंदाज सामनावीर दक्ष किरोडिअनने साहिल पारखला बाद केले. त्यानंतर ५ बाद १०८ वरुन विस्डमला २८.२ षटकांत १४१ इतकीच मजल मारता आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

X