इंडियन ऑईल चषक: रायन, शरद पवार स्कूलचाही विजय,साळवेची शतकी खेळी,तमखाने,किरोडियन, देसले,पटेल चमकले

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने – एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेतील २५ षटकांच्या सामन्यांच्या पाचव्या दिवशी सेंट लॉरेन्स, के ए सी एफ बारामती, अशोका, गोल्डन होरायजन, रायन व शरद पवार इंटरनॅशनल यांनी आपले सामने जिंकले.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब वर पहिल्या सामन्यात के ए सी एफ , बारामतीने चुरशीच्या लढतीत फ्रावशी इंटरनॅशनल अकादमी वर ५ गडी राखून विजय मिळवला. सोहम तमखाने च्या ८३ धावांमुळे फ्रावशी इंटरनॅशनल १४७ धावा केल्या पण दक्ष किरोडियन ३१ व शौर्य शाहीर नाबाद २४ च्या जोरावर के ए सी एफ ने शेवटच्या षटकात फ्रावशी वर ५ गडी राखून मात केली. सामनावीर अष्टपैलू दक्ष किरोडियन ३१ व २ बळी घेतले.
अशोकाचा दणदणीत विजय
दुसर्या सामन्यात अशोका वडाळा ने रायन इंटरनॅशनल ओझर वर 9 गडी राखून मोठा विजय मिळविला. अशोका वडाळा च्या ७८ धावांना रायन इंटरनॅशनल ओझर ने केवळ एक गडी गमावून आरामार पार केले. सामनावीर ३ गडी बाद करणारा अशोकाचा अर्णव तांबट यशस्वी ठरला.

देसलेचे पाच बळी
तिसर्या सामन्यात सेंट लॉरेन्स ने सेंट विन्सेंट वर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळविला . सामनावीर साईराज देसले च्या ५ बळींच्या जोरावर सेंट विन्सेंट ला केवळ १६ धावात रोखून सेंट लॉरेन्स ने मोठा विजय मिळविला .
चौथ्या सामन्यात गोल्डन होरायजन ने गुरु गोविंद वर ३६ धावांनी मात केली. सामनावीर आदित्य साळवे च्या जोरदार शतकामुळे गोल्डन होरायजन ने २०२ धावांच्या आव्हानाचा सामना करताना गुरु गोविंद १६५ पर्यन्त च मजल मारू शकला .
पवारस्कूलची एसएसके वर मात
महात्मा नगर मैदानावर पहिल्या सामन्यात चुरशीच्या लढतीत शरद पवार इंटरनॅशनल ने एस एस के वर 11 धावांनी मात केली . जिष्णू पगार व जेनील पटेल च्या लागोपाठ दुसर्या अर्धशतकांमुळे केलेल्या १३७ धावांचा पाठलाग करताना सामनावीर नील वाकचौरे च्या ३ बळी मुळे एस एस के ला १२६ पर्यंत च मजल मारता आली.
दुसर्या सामन्यात रविंद्र विद्यालयवर रायन इंटरनॅशनल ने ८ गडी राखून जोरदार विजय मिळविला.सामनावीर रायन इंटरनॅशनल च्या आयुष जागले च्या ५ बळींमुळे केलेल्या रविंद्र विद्यालयच्या झालेल्या १३१ धावा रायन इंटरनॅशनलने दोन गडी गमावून सहज पार केल्या.