`हकिम मर्चंट` क्रिकेट करंडक स्पर्धेला दिमाखात सुरवात

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा पुढाकार: एन डी सी ए चा ऐतिहासिक डिजिटल श्रीगणेशा

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट करंडक स्पर्धेला आज दिमाखात सुरवात झाली.

स्पर्धा प्रायोजक शब्बीर भाई मर्चंट यांच्याहस्ते नाणेफेक करुन हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सुरवात झाली. प्रयोजक मेसन ट्रेडर्स गेल्या अनेक वर्षांपासून ही क्रिकेट स्पर्धा प्रायोजित करीत आहेत. श्री अब्बासभाई मर्चंट व आता श्री शब्बिरभाई मर्चंट ह्यांचे हे कार्य अतिशय अभिनंदनीय व प्रशंसनीय आहे .ही विशेष बाब याठिकाणी नमूद करावेसे वाटते.

संघटनेचे विविध नवनवीन उपक्रम, डिजीटलचा श्रीगणेशा

हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी बरोबर एन डी सी ए चा ऐतिहासिक डिजिटल अध्याय सुरु होत आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना – एन डी सी ए – २०२२-२३ हे ५० वे – सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने या हंगामात जिल्हा क्रिकेट संघटना विविध नवनवीन उपक्रम हाती घेतले आहेत . त्यात सध्याच्या सायबर , इंटरनेट व डिजिटल युगाला साजेशे असे अजून एक अतिशय महत्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. ते म्हणजे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सामन्यांचे थेट – live – प्रक्षेपण करण्यास या स्पर्धेपासून शुभारंभ झाला आहे. स्पोर्टवोट, मुंबई ने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण प्रसारण सुरू केले आहे. स्पोर्टवोट हे अँप डाउनलोड करून सर्व क्रीडाप्रेमी या सामन्यांचा आनंद कोठूनही थेट घेऊ शकतात. एन डी सी ए ची डिजिटल सहयोगी स्पोर्टवोट, मुंबई नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण करेल आणि स्पोर्टवोट,एन.डी.सी.ए अंतर्गत सर्व खेळाडूंची प्रोफाइलिंग करणार आहे .

आठ गटातील २४ संघात लढत

हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी स्पर्धा वरिष्ठ – खुल्या वयोगटात – १७ गटातील ५१ संघात रंगणार आहे . खुल्या गटात एकंदर मर्यादित ५० षटकांच्या ६७ एकदिवशीय सामन्यांची मेजवानी स्थानिक खेळाडू व क्रिकेट प्रेमींना १५ मार्च ते २० मे २०२३ मिळणार आहे. सदर सामने नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर नियोजित आहेत. तसेच १९ वर्षांखालील वयोगटातील स्पर्धा देखील ८ गटातील २४ संघात १४ मार्च ते ३० एप्रिल अशी.महात्मा नगर व एम सी सी , म्हसरूळ अशा क्रिकेट मैदानांवर रंगणार आहे.

सोहळ्यास मान्यंवरांची उपस्थिती

गोल्फ क्लब २ वर एन डी सी ए चेअरमन विनोद शहा यांच्या शुभहस्ते नाणेफेक करण्यात आली. या २०२२-२३ हंगामातील बहुप्रतिक्षित व खेळाडूप्रिय हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या शुभारंभ प्रसंगी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर प्रायोजक शब्बीर भाई मर्चंट यांचेसह स्पोर्टवोटच्या सह-संस्थापक, सुश्री. शुभांगी गुप्ता , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे , खजिनदार हेमंत देशपांडे , पदाधिकारी डॉ. भांडारकर, बाळू मंडलिक , सी ई ओ रतन कुयटे , ऑफिसर संदीप सेनभक्त , प्रशिक्षक शेखर घोष , मंगेश शिरसाट , पंच व प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू उपस्थित होते.

आजच्या सामन्यांत गोल्फ क्लब १ वर एलेवन ब्रदर्सने क्रिसेन्ट वर ६ गडी राखून तर गोल्फ क्लब २ वर एन डी सी ए मॉर्निग ने एस जी सी ए वर २५ धावांनी विजय मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published.

X