`हिमाचल` विरूध्दच्या सामन्यात माया,रसिका चमकल्या

माया सोनवणेचे ५४ धावात तीन बळी, रसिकांच्या ४४ चेंडूत ३० धावा: आठव्या गडायासाठी ४१ धावांची बहुमोल भागीदारी

नाशिक-भारतीय क्रिकेट नियामक मंडळ- बीसीसीआयतर्फे गुवहाटी येथे सुरु असलेल्या वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील हिमाचल प्रदेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाशिकच्या क्रिकेटपटू माया सोनवणे व रसिका शिंदे यांनी चमकदार कामगिरी केली .

हिमाचल प्रदेशने प्रथम फलंदाजी करत ९ बाद २४२ धावा केल्या. महाराष्ट्र संघातर्फे फिरकीपटू माया सोनवणेने १० षटकांत ५४ धावा देत ३ गडी बाद केले. आरती केदार व एम आर मगरेने प्रत्येकी २ गडी बाद केले. उत्तरादाखल कर्णधार एस एस शिंदे च्या अर्धशतका नंतरही महाराष्ट्र संघाची ५ बाद ९८ अशी स्थिति झाली. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना रसिका शिंदेने ४४ चेंडूत १ षटकार व ३ चौकार मारत ३० धावा केल्या व आठव्या विकेटसाठी एस बी पोखरकर बरोबर ४१ धावांची भागीदारी केली. तरीही महारराष्ट्र संघ ९ बाद १८० पर्यंतच मजल मारू शकल्यामुळे हिमाचल प्रदेश ६२ धावांनी विजयी झाले. माया सोनवणे व रसिका शिंदे यांची कामगिरी महाराष्ट्राचा पराभव टाळू शकली नाही.

, या वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे बाकी सामने पुढील प्रमाणे होणार आहेत : २१ जानेवारी – विदर्भ , २३ जानेवारी – हैद्राबाद ,२५ जानेवारी – गोवा , २७ जानेवारी – बिहार व २९ जानेवारी – उत्तराखंड .

Leave a Reply

Your email address will not be published.

X