नाशिक-सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र (नाना) सूर्यवंशी यांच्या सहकार्याने व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेसाठी आजपासून(ता. २ नोव्हेंबर) तालुकानिहाय निवड प्रक्रिया सुरू झाली. आज पहिल्या दिवशी मालेगाव व इगतपुरी येथे त्याचा शुभारंभ झाला, या स्पर्धेचे हे नववे वर्ष आहे. या टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेमुळे नाशिक जिल्ह्यातील तालुक्यातील खेळाडूंना जिल्हास्तरावर आपल्या कामगिरीचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. खास या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विविध निवड समिती सदस्य जिल्ह्याच्या सर्व १५ तालुक्यात जाऊन निवडीची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्येक तालुक्याचा अंतिम संघ निवडणार आहेत.
८ नोव्हेंबर तालुकानिहाय चालणार्या या निवड प्रक्रियेचा तपशील असा
