`एनडीसीए` तर्फे शनिवारी महिला खेळाडूंसाठी संघ निवड चाचणी

नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्पर्धा होणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे  १९  वर्षांखालील महिला खेळाडूंची जिल्हा क्रिकेट संघ निवड चाचणी शुक्रवारी(ता.७) सकाळी साडेनऊला हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब  येथे घेण्यात येणार आहे. 

इच्छुक महिला क्रिकेट खेळाडूंनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब  येथील कार्यालयात कामकाजाच्या वेळेत शुक्रवार दिनांक ७  एप्रिल   पर्यंत  नावनोंदणी करणे आवश्यक आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

मुली व महिला खेळाडूंना उत्तेजन देण्याच्या नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या धोरणानुसार नोंदणी शुल्क ठेवण्यात आलेले नाही. नावे नोंदविलेल्या महिला खेळाडूंनी क्रिकेट पोशाखात , स्वतःच्या क्रिकेट साहित्यासह शनिवारी(ता. ८ एप्रिल) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब वर सकाळी साडेनऊ ( ०९३० ) वाजता हजर रहावे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

X