वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा: पवन सानपने डावात ५ बळी नोंदवत केली सर्वीत्तम कामगिरी, सामने पाहण्यांची सर्वांनाच सुवर्णसंधी

औरंगाबाद- येथे खेळल्या गेलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए सिनियर इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात, डेक्कन जिमखानाने नाशिक विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले. नाशिकतर्फे गोलंदाजीत डावखुरा जलदगती पवन सानपने डावात ५ बळी घेण्याची प्रभावी कामगिरी केली.
पहिल्या दिवशी डेक्कन जिमखानाला नाणेफेक जिंकून नाशिकने प्रथम फलंदाजी दिली. पावसामुळे जवळपास अर्धा दिवसाचा खेळ झाला नाही. डावखुरा जलदगती पवन सानपच्या ५ बळींमुळे डेक्कन जिमखाना ४४.१ षटकांत १६७ वर सर्वबाद झाले. तेजस पवारने २ तर गुरमानसिंग रेणु , तन्मय शिरोडे , प्रतीक तिवारी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. दुसऱ्या दिवशी पियूष साळवी व अजय बोरुडे यांनी प्रत्येकी ४ बळी घेत नाशिकला ४३.२ षटकांत १६१ वर सर्वबाद करत, ६ धावांची नाममात्र पण अतिशय महत्वाची आघाडी घेतली. सिद्धार्थ नक्काने सर्वाधिक ४९ तर कुणाल कोठावदेने २९ व मुर्तुझा ट्रंकवालाने २२ धावा केल्या. दुसऱ्या डावात डेक्कन जिमखानाने बिनबाद ५८ धावा केल्या व सामना अनिर्णित अवस्थेत संपला. डेक्कन जिमखानाने पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले.
संक्षिप्त धावफलक : डेक्कन जिमखाना – पहिला डाव – सर्वबाद १६७ व दुसरा डाव – बिनबाद ५८ वि. नाशिक – पहिला डाव सर्वबाद १६१ . सामना अनिर्णित. डेक्कन जिमखानाला पहिल्या डावातील आघाडीचे गुण.

सामने पाहण्याची सुवर्ण संधी
नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने क्रिकेट रसिकांना क्रीडा सामन्यांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने काही दिवसांपुर्वीच स्पोर्टस् वोट बरोबर करार केला. हकीम मर्चंट स्पर्धेत जवळपास ४८ क्लब सहभागी झाले आहे. ५० षटकांचे हे सामने असतील.. या थेट प्रेक्षपणामुळे खेळाडूंना आपल्या खेळ सुधारण्याची त्याचप्रमाणे अधिक चांगला खेळ उंचावण्याची संधी मिळाली आहे. अनुभवी क्रिकेटपटूंबरोबरच नवीन उदयोन्मुख क्रिकेटपटू याकडे आकर्षीत होऊ शकतात. थेट सामन्यामुळे राष्ट्रीयस्तरावर पोहचण्याची तसेच आपला वेगळा नावलौकीक मिळवून देण्यासाठी एनडीसीए ने हे वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशाप्रकारच्या सामन्याचे थेट प्रेक्षपण करून आनंद देणारी एनडीसीए ही एकमेव असोसिएशन आहे हकीम मर्चंट ट्राॉफीतील सामन्याना सुरुवात झाली आहे. हे आपण पुढील लिंकवर पाहुन शकता, त्यासाठी आपल्याला हे अँप डाऊनलोड करून त्यावर सामना पाहता येईल
Nashik District Cricket Association Presents
Hakim Trophy 2023 One of Biggest Cricket Tournaments in Maharashtra
15th March Onwards, Live Exclusively on SportVot https://bit.ly/HakimTrophy2023
Download the App: http://bit.ly/SportVotForAndroid