१५ वर्षाखालील मुलींसाठी जिल्हा संघ निवड चाचणी

नाशिक- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १५ वर्षांखालील मुलींसाठी राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्पर्धा होणार असुन त्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १५ वर्षांखालील मुलींची जिल्हा क्रिकेट संघ निवड चाचणी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे घेण्यात येणार आहे. यासाठी १ सप्टेंबर २००८ ( ०१/०९/२००८ ) नंतर जन्मलेल्या खेळाडूंचा विचार करण्यात येईल.

इच्छुक मुलींनी, क्रिकेट खेळाडूंनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथील कार्यालयात कामकाजाच्या वेळेत शुक्रवार २६ मे पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. निवड चाचणी शनिवार दिनांक २७ मे रोजी घेण्यात येईल. मुली व महिला खेळाडूंना उत्तेजन देण्याच्या नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या धोरणानुसार नोंदणी शुल्क ठेवण्यात आलेले नाही. निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.


Leave a Reply

Your email address will not be published.

X