`द्वारका क्रिकेट अकादमी` अजिंक्य

एस एम बी टी मान्सून लीग वरिष्ठ गट स्पर्धा: ट्रंकवाला, कांचवाला,विश्वकर्मा, मोहित नेगी,प्रमोद नारळे, रविंद्र मत्च्याची तडाखेबाज फलंदाजी

द्वारका क्रिकेट अकादमीचा विजयी संघ प्रशिक्षक अतुल गोसवी यांचेसह –

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, एस एम बी टी मान्सून लीग २०२२-२३ स्पर्धेतील, वरिष्ठ खुल्या अ गटातील मर्यादित ४५ षटकांच्या अंतिम सामन्यात द्वारका क्रिकेट अकादमीने , नासिक क्रिकेट अकादमी – एन सी ए – संघावर ५ गडी राखून मात करत स्पर्धेचे विजेतेपद दिमाखात पटकावले.

हर्षल तांबेंच्या , एस एम बी टी प्रायोजित मान्सून लीग स्पर्धेचे हे सलग चौथे वर्ष. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित चार गटात, वरिष्ठ खुल्या वयोगटातील १६ संघांत झालेल्या एकूण २५ सामन्यांनंतर हि वरिष्ठ खुल्या अ गटातील स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.

यशस्वीपणे पाठलाग करत खेचली विजयश्री

महात्मा नगर क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात, प्रथम फलंदाजी मिळालेल्या नासिक क्रिकेट अकादमी – एन सी ए – ने ४० षटकांत सर्वबाद २०४ धावा केल्या. त्यात मोहित नेगीच्या ६८ , प्रमोद नारळेच्या ५३ व रविंद्र मत्च्याच्या ४४ धावांचा मुख्य वाटा होता. १ बाद १५४ नंतर द्वारका क्रिकेट अकादमीतर्फे लेग स्पिनर कुणाल त्रिपाठीने सर्वाधिक ४ , स्मित नाथवानी व सिद्धार्थ मानकरने प्रत्येकी २ तर धनंजय ठाकूरने १ गडी बाद करत एन सी ए ला २०४ धावांत रोखले. विजयासाठीच्या २०५ धावा द्वारकाने मोहम्मद ट्रंकवाला ६७, मुस्तानसिर कांचवाला ५३ व आनंद विश्वकर्मा नाबाद ४४ यांच्या फलंदाजीतील प्रमुख योगदानाच्या जोरावर ४१ षटकांत पाच गडी राखून पार केल्या व एस एम बी टी मान्सून लीग वरिष्ठ गट स्पर्धेचे विजेतेपद मुर्तुझा ट्रंकवालाच्या नेतृत्वात दिमाखात पटकावले.

Leave a Reply

Your email address will not be published.

X