`द्वारका क्रिकेट अकादमी`ने पटकावला हकीम मर्चंट करंडक

हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी: रोहित पुरोहितची अष्टपैलू चमक,एन डी सी ए चा ऐतिहासिक डिजिटल अध्याय यशस्वीरीत्या सुरु

नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात द्वारका क्रिकेट अकादमीने सिध्दीविनायक संघावर सहा गडी राखून मात करत विजेतेपद पटकावेल

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ही स्पर्धा घेण्यात आली. विशेष लक्षणीय बाब म्हणजे प्रयोजक मेसन ट्रेडर्स गेल्या अनेक वर्षांपासून ही हकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धा प्रायोजित करीत आहेत. श्री अब्बासभाई मर्चंट व आता श्री शब्बिरभाई मर्चंट ह्यांचे हे कार्य अतिशय अभिनंदनीय व प्रशंसनीय आहे .

यंदाची खास बाब म्हणजे या हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी बरोबर एन डी सी ए चा ऐतिहासिक डिजिटल अध्याय सुरु झाला . नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना – एन डी सी ए – २०२२-२३ हे ५० वे – सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सामन्यांचे थेट – live – प्रक्षेपण करण्यास या स्पर्धेपासून शुभारंभ झाला. स्पोर्टवोट, मुंबई ने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण प्रसारण केले. स्पोर्टवोट हे अँप डाउनलोड करून हजारो क्रीडाप्रेमींनी या सामन्यांचा थेट आनंद घेतला .नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित २० गटातील वरिष्ठ खुल्या गटातील ६० संघात झालेल्या, मर्यादित ५० षटकांच्या एकूण ६७ सामन्यांनंतर हि स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न आली.

अनिकेत सिंगची एकाकी लढत

अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सिद्धिविनायकने सलामीवीर अनिकेत सिंगच्या ६३ धावांच्या जोरावर ४४.३ षटकांत १६९ धावा केल्या. अझान सुराणीने ३५ धावा केल्या . द्वारकाच्या ऑफ स्पिनर रोहित पुरोहितने जोरदार कामगिरी करत ६ गडी बाद केले. स्मित नाथवानीने २ , तर कुणाल त्रिपाठी व समकीत सुराणाने प्रत्येकी १ बळी घेतला.

रोहित पुरोहितच्या फटकेबाज नाबाद ८८ धावा

उत्तरादाखल द्वारका क्रिकेट अकादमीने पाचव्या क्रमांकावरील रोहित पुरोहितच्या ७० चेंडूतील शानदार फटकेबाज नाबाद ८८ धावांच्या जोरावर २६.१ षटकांत ४ गडी गमावत दिमाखात विजय मिळवला. रोहितने ४ षटकरांसह ११ चौकार ठोकले. मोहम्मद ट्रंकवालाने २२ व हर्ष शार्दूलने नाबाद १८ धावा केल्या . अभिषेक जंगमने २ तर विजय ठाकूर ने १ गडी बाद केला. या प्रकारे द्वारका क्रिकेट अकादमीने एस एम बी टी मान्सून लीग पाठोपाठ हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेचेहि विजेतेपद पटकावले. या हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत मंडलिक क्रिकेट अकादमीच्या तर्फे फलंदाजीत रोहित पुरोहितने ६ सामन्यातील ३०२ धावांसह प्रथम स्थान मिळविले. तर गोलंदाजीत आई तुळजाभावानीच्या लेग स्पिनर मयूर दावणगेने सर्वाधिक १५ गडी बाद केले. द्वारका संघास शिरीष लढ्ढा , प्रशिक्षक अतुल गोसवी, आनंद विश्वकर्मा , प्रद्युम्न राखे तसेच रणजीपटू मुर्तुझा ट्रंकवालाचेहि खास मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published.

X