
ईश्वरी सावकारला पुन्हा गुणवत्ता सिध्द करण्याची संधी: शाल्मली क्षत्रीयला मिळणार अनुभव
नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकार व शाल्मली क्षत्रियची , मुलींच्या १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली आहे. ईश्वरी सावकारची मागील हंगामात देखील एन सी ए कॅम्प व बीसीसीआयच्या हाय परफॉरमन्स शिबिरासाठी देखील निवड निवड झाली होती. माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , होतकरू खेळाडूंसाठी हे शिबीर होणार आहे. विविध स्पर्धेतील लक्षणीय कामगिरीच्या जोरावर ईश्वरी सावकारची हि निवड होत आली आहे. त्याबरोबरच यंदा शाल्मली क्षत्रियची देखील निवड झाली आहे.

या महत्वाच्या शिबिरासाठी झालेल्या निवडीबद्दल, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ईश्वरी व शाल्मलीचे खास अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
१७ एप्रिल ते ११ मे २०२३ दरम्यान हे राष्ट्रीय पातळीवरील शिबिर होत आहे. याअंतर्गत ईश्वरी सावकार चंदिगड तर शाल्मली क्षत्रिय रांची ला रवाना होईल.